Join us  

Animal सिनेमाबाबत होणाऱ्या ट्रोलिंगवर अखेर रणबीरने सोडलं मौन, म्हणाला, "बॉक्स ऑफिस नंबर पाहून हे सिद्ध..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 3:48 PM

'ॲनिमल'ला ट्रोल करणाऱ्यांना रणबीरचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, "कोणीही वाईट म्हटलं तरीही..."

रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला 'ॲनिमल' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. २०२३च्या अखेरीस प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, रणबीर कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'ॲनिमल' चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं. या सिनेमातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली होती. पण, काही सीन्स आणि डायलॉग्समुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. 

'ॲनिमल'मधील रणबीर आणि बॉबीच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. पण, त्याचबरोबरच या सिनेमाला ट्रोलही करण्यात आलं. "lick my shoe" या डायलॉगवरुन रणबीरलाही ट्रोल केलं होतं. पण, याबाबत रणबीरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. नुकतीच 'ॲनिमल'ची सक्सेस पार्टी झाली. यावेळी रणबीरने 'ॲनिमल'वरुन झालेल्या ट्रोलिंगवर मौन सोडत प्रथमच भाष्य केलं आहे. 

'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत रणबीर म्हणाला, "'ॲनिमल' सिनेमाला मिळालेल्या सक्सेससाठी मी आभारी आहे. अनेक लोकांना सिनेमाबाबत आक्षेप होता आणि अनेकांनी ट्रोलही केलं होतं. पण, बॉक्स ऑफिस नंबर पाहून हे सिद्ध झालं आहे की चित्रपटापेक्षा जास्त काहीच नाही. मग कोणी कौतुक करो किंवा सिनेमाला वाईट म्हणो." 

संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमाला प्रदर्शित होऊन ४० दिवस झाले आहेत. या सिनेमाने आत्तापर्यंत देशात ५५० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. तर लवकरच जगभरात हा चित्रपट ९०० कोटींचा आकडा पार करेल. 

टॅग्स :रणबीर कपूरसिनेमासेलिब्रिटी