पडद्यावर दिसणार रणबीर- अनुष्काचा चिंब ओला रोमान्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 19:47 IST
पाऊस आणि प्रेमाचे नातेच विलक्षण आहे. म्हणूनच रूपेरी पडद्यावरही या अलवार नात्याची हळूवार भावना वेळोवेळी प्रतिबिंबीत झाली आहे. याच ...
पडद्यावर दिसणार रणबीर- अनुष्काचा चिंब ओला रोमान्स!
पाऊस आणि प्रेमाचे नातेच विलक्षण आहे. म्हणूनच रूपेरी पडद्यावरही या अलवार नात्याची हळूवार भावना वेळोवेळी प्रतिबिंबीत झाली आहे. याच क्रमातून आता रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा या दोघांचा चिंब ओला रोमान्स आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रेमकथांना एका वेगळया शैलीत पडद्यावर सादर करण्यात करण जोहरचा हातखंडा आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच. आता करण रणबीर, ऐश्वर्या राय आणि अनुष्का शमार्ला घेऊन 'ए दिल है मुश्किल' नावाचा एक चित्रपट बनवतोय. याच चित्रपटात रणबीर- अनुष्काचा चिंब ओला रोमान्स रंगणार असल्याची बातमी आहे. ही बातमी पुढे आल्यापासून दोघांच्याही चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. त्याला कारणही तसेच आहे. रणबीर- अनुष्काची हॉट केमेस्ट्री याआधीच्या 'बॉम्बे वेल्वेट' या चित्रपटात प्रेक्षकांनी अनुभवली आहे. आणि आता तर या दोघांच्या सोबतीला आंतबाहय भिजवणारा पाऊसही असणार आहे. हा चित्रपट पडद्यावर येइल तेव्हा कदाचित पावसाळा नसेल. पण, प्रेक्षक मात्र चिंब भिजतील यात काही शंका नाही...