Join us

​रणबीर कपूर आणि कंगना राणौतमध्ये होते शारीरिक संबंध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 12:57 IST

कंगना रeणौतने आप की अदालत या कार्यक्रमात हृतिक रोशनबद्दल केलेल्या विधानामुळे हा एपिसोड सोशल मीडियामध्ये चांगलाच गाजला होता. कंगना ...

कंगना रeणौतने आप की अदालत या कार्यक्रमात हृतिक रोशनबद्दल केलेल्या विधानामुळे हा एपिसोड सोशल मीडियामध्ये चांगलाच गाजला होता. कंगना आणि हृतिक यांच्यात मेलद्वारे संभाषण व्हायचे असे अनेकवेळा कंगनाने तिच्या मुलाखतीत म्हटले आहे. तर याविरोधात आता हृतिकने कंगना त्याची बदनामी करत असल्याची तक्रार दाखल केली आहे. त्याने तक्रारीत म्हटले आहे की, कंगनाने बराच काळ माझा पिच्छा पुरवला. ती मला सेक्शुअल मेल करायची. त्यातील एका मेलविषयी कोईमोई या वेबसाईटने लिहिले असून हा मेल वाचून कंगनाच्या फॅन्सना धक्काच बसणार आहे. या मेलमध्ये कंगना आणि रणबीर कपूर यांच्यातील बाँडिंग विषयी लिहिण्यात आले आहे. हा मेल वाचल्यानंतर कंगना आणि रणबीर यांच्यात शारीरिक संबंध होते का असा प्रश्न नक्कीच पडत आहे.कंगनाने हृतिकला लिहिलेल्या एका मेलमध्ये म्हटले आहे की, मला आठवतंय रंगूने (रंगोली) पाठवलेल्या एका मेलमध्ये मी आणि आरके खूप चांगले फ्रेंड्स असल्याचे म्हटले होते. माझ्यात आणि आरकेमध्ये काही संबंध आहे का याबाबत रंगूला चांगलीच उत्सुकता आहे. कारण ती नुकतीच आरकेला भेटली त्यावेळी तो तिच्याशी खूप चांगला वागला. मी तुला आरके आणि माझ्या मैत्रीविषयी सांगत आहे. मी ज्या ज्या इव्हेंटविषयी येथे लिहित आहे, त्याबद्दल तू आरकेशी बोलून खात्री करून घेऊ शकतोस.क्वीन या चित्रपटाच्या आधी कधीच आरकेने माझ्याकडे लक्ष दिले नव्हते. पण फँटममध्ये क्वीनचे फुटेज पाहून त्याने बीबीएमवर मला मेसेज केला होता. तसेच त्यानंतर तो अनेकवेळा मला फनी मेसेजेस पाठवत असे. तसेच रिव्होलव्हर या चित्रपटाचे ग्वाहलेरमध्ये चित्रीकरण सुरू असताना त्याने माझ्यात रस दाखवला होता. पण मी दुसऱ्या कोणाच्या प्रेमात असल्याचे त्यावेळी त्याला मी सांगितले होते. एवढेच नव्हे तर माझ्या प्रियकरासोबत असलेल्या नात्यामुळे मी सध्या चिंतेत असल्याचे देखील मी त्याला सांगितले होते. (तू माझ्या वाढदिवसाला आला होतास आणि त्यावेळी आपल्यात खूप भांडणं झाली होती त्यावेळी मी खूप टेन्शनमध्ये होती. आरकेला मी माझ्या आयुष्यात दुसरे कोणीतरी आहे याची कल्पना द्यावी असे मला वाटले होते. त्यामुळे तो मला अधिक समजून घेईल असे मला वाटले होेते. पण मी तुझे नाव त्याच्यासमोर घेतले नव्हते). त्यानंतर आमच्यात काही दिवस काहीही संवाद नव्हता. मी एनवायसीमध्ये असताना एनवायसी कसे आहे हे विचारण्यासाठी त्याचा मेसेज आला होता. त्यावेळी त्याला माझ्यासोबत शारिरिक संबंध प्रस्थापित करायचे आहे का असे मी त्याला विचारले होते. त्यावर आपल्यात रेग्युलर रिलेशनशिप का नसावे असा प्रश्न त्याने विचारला होता. पण मी कोणाच्या तरी प्रेमात आकंठ बुडाली आहे हे ऐकून त्याला वाईट वाटले होते. मी तुझ्यासोबत नात्यात असल्याचे मी त्याला कधीच सांगितले नाही. तुझे नाव कधीच येऊ दिले नाही. मी माझ्या भावाची शपथ घेऊन सांगते. कारण मी सर्वात जास्त माझ्या भावावर प्रेम करते. Also Read : कंगना राणौतची बहीण रंगोलीचा चढला पारा! हृतिक रोशलला म्हणाली, ‘अंकल, कंगनाला विसर’!!