रणबीर कपूर व दीपिका पादुकोणला इम्तियाज आणणार का एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 13:55 IST
रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण हे तरूणांचे ‘फेवरेट आॅनस्क्रीन कपल’ पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता आहे. होय, दिग्दर्शक इम्तियाज ...
रणबीर कपूर व दीपिका पादुकोणला इम्तियाज आणणार का एकत्र?
रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण हे तरूणांचे ‘फेवरेट आॅनस्क्रीन कपल’ पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता आहे. होय, दिग्दर्शक इम्तियाज अली या हॉट जोडीला पुन्हा एकदा एकत्र आणू शकतो. इम्तियाज अली स्वत: दीपिका व रणबीरचा मोठा फॅन आहे. या दोघांसोबत एक वेगळेच कंफर्ट लेवल आहे, असे इम्तियाज नेहमी म्हणतो. त्यामुळेच या दोघांसोबत काम करण्याची तो जणू संधी शोधत असतो. आम्हाला सांगायला आनंद होतोय की, इम्तियाजला ही संधी मिळाली आहे. इम्तियाज अली एक नाटक करतो आहे आणि यात त्याला दीपिका व रणबीर हे दोघे हवे आहेत. रणबीर व दीपिका यापूर्वी इम्तियाजच्या ‘तमाशा’मध्ये एकत्र दिसले होते. याशिवाय इम्तियाजने रणबीरसोबत ‘रॉकस्टार’मध्ये काम केले आहे. दीपिकासोबतही ‘लव्ह आजकल’ आणि ‘कॉकटेल’ असे दोन चित्रपट त्याने केले आहेत. आता या दोघांना इम्तियाज एका नाटकात एकत्र आणू इच्छित असेल तर चाहत्यांसाठी यापेक्षा आनंदाची दुसरी कुठलीच बातमी नाही. अर्थात इम्तियाज या प्रोजेक्टवर कधीपासून काम सुरु करणार, हे त्याने अद्याप स्पष्ट केलेले नाही. पण मीडियाचे मानाल तर या प्रोजेक्टसाठी आपल्याला काही काळ वाट बघावी लागू शकते. कारण इम्तियाज सध्या अनुष्का शर्मा व शाहरूख खान स्टारर चित्रपटात बिझी आहे. यानंतर कदाचित तो नाटकाचा हा प्रोजेक्ट हाती घेईल.ALSO READ: OMG!! फॉरेन मीडियाने दीपिका पादुकोणला समजले प्रियांका चोप्रा!रणबीर कपूर व दीपिका पादुकोण या दोघांची लव्हलाईफ तुम्हाला ठाऊक आहेच. अर्थात सध्या या दोघांचे ब्रेकअप झाले आहे. पण असे असले तरी रणबीरबाबत दीपिका कमालीची प्रोटेक्टिव्ह आहे. रणबीरबाबत कुणीही वाईट बोललेल, दीपिकाला जराही सहन होत नाही.