अभिनेता रणबीर कपूरच्या अलीकडे रिलीज झालेल्या ‘संजू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम रचले. या चित्रपटानंतर रणबीर ‘ब्रह्मास्त्र’च्या तयारीत लागला. ‘ब्रह्मास्त्र’ हा तीन भागांत रिलीज होणार आहे. साहजिकचं या चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. आज धर्मा प्रॉडक्शनने या चित्रपटाच्या पहिल्या भागाची रिलीज डेट जाहिर केली. त्यानुसार, याचा पहिला भाग पुढील वर्षी नाताळच्या मुहूर्ताला प्रदर्शित होणार आहे.करण जोहरने आपल्या सोशल अकाऊंटवर याची घोषणा केली. ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग नाताळ २०१९ मध्ये रिलीज होईल, असे त्याने लिहिले.
जाणून घ्या कधी रिलीज होणार रणबीर कपूर-आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 15:03 IST
अभिनेता रणबीर कपूरच्या अलीकडे रिलीज झालेल्या ‘संजू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम रचले. या चित्रपटानंतर रणबीर ‘ब्रह्मास्त्र’च्या तयारीत लागला. ‘ब्रह्मास्त्र’ हा तीन भागांत रिलीज होणार आहे.
जाणून घ्या कधी रिलीज होणार रणबीर कपूर-आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’!
ठळक मुद्देआज धर्मा प्रॉडक्शनने ‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या भागाची रिलीज डेट जाहिर केली. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे.