Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या परवानगीशिवाय रणबीरचे लग्न नाही-डिप्पी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:53 IST

बॉलीवूडमधील दीपिका आणि रणबीरची जोडी ही सध्याच्या युवकांची फेव्हरेट जोडी आहे. आगामी चित्रपट 'तमाशा' च्या प्रमोशनसाठी दीपिका आणि रणबीर ...

बॉलीवूडमधील दीपिका आणि रणबीरची जोडी ही सध्याच्या युवकांची फेव्हरेट जोडी आहे. आगामी चित्रपट 'तमाशा' च्या प्रमोशनसाठी दीपिका आणि रणबीर बिझी असून याच महिन्यात चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दोघांच्याही लग्नाविषयीच्या बातम्यांना चित्रपटाबरोबरच उधाण आले होते. रणबीर म्हणतो की, ' माझा लग्न या संस्थेवर विश्‍वास आहे. मी कधी लग्न करावे हे सर्वस्वी माझ्या आईवडिलांवर सोपवले आहे. तसेच चाहत्यांनीही सांगावे की मी केव्हा लग्न करायला हवे?' मात्र त्याची सहकलाकार आणि मैत्रीण दीपिका पदुकोन त्याला सांगते की, ' रणबीर तेव्हाच लग्न करू शकतो जेव्हा मी त्याला परवानगी देईल. आता कॅटरिनाकडून काय प्रतिक्रिया मिळते हे महत्त्वाचे आहे. तिलाही याविषयी काही बोलायचे असेल का? कळेलच थोड्या दिवसांत.