Join us

आलिया-रणबीरची 'लग्न'घटिका समीप, नीतू अन् रिद्धीमा कपूर लागल्या तयारीला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 17:51 IST

Neetu kapoor and riddhima kapoor spotted at manish malhotra office : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या जाम चर्चेत आहे. दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या जाम चर्चेत आहे. दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, हे तर जगापासून लपलेले नाही. स्वत: रणबीर व आलियानेही याची जाहीर कबुली दिली आहे. पण सध्या चर्चा सुरु आहे ती दोघांच्या लग्नाची. त्याला कारणही तसचे आहे, रणबीर कपूरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर सहानी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या ऑफिस बाहेर स्पॉट झाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा रणबीर-आलियाच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला आहे.  

मनीष मल्होत्राच्या घराबाहेर रिद्धिमा कपूर साहनी आणि नीतू कपूर यांना पहिल्यानंतर  रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाची तयारी सुरु झाली की काय अशी चर्चा ऐकायला मिळतेय. नीतू आणि रिद्धिमा घराबाहेर पडल्या आणि त्यांनी फोटोग्राफर्सना ही पोज दिल्या.

काही महिन्यांपूर्वी पत्रकार राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत रणबीरने लग्नाबद्दल मोठा खुलासा केला होता. कोरोना महामारी नसती तर माझे व आलियाचे लग्न झाले असते, असे तो म्हणाला होता.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर रणबीर कपूर लव रंजनाचा आगामी चित्रपट श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. २०२२च्या होळीच्या मुहूर्ताला म्हणजेच १८ मार्चला भेटीला येणार आहे. तर आलिया भटसोबत तो ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहे.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरनितू सिंग