Join us

​रणबीर-आलिया-अमिताभ येणार एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 21:28 IST

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आगामी ड्रगन या चित्रपटात आलिया भट्टसोबतच महानायक अमिताभ बच्चन महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. अयान मुखर्जीच्या ...

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आगामी ड्रगन या चित्रपटात आलिया भट्टसोबतच महानायक अमिताभ बच्चन महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या ‘ड्रगन’ या चित्रपटात प्रथमच रणबीर व अमिताभ स्क्रिन शेअर करणार आहे. अमिताभ यांनी अयानला आपला होकार कळविला असून यात ते पाहुण्या कलावंताची भूमिका करणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर कपूर-आलिया भट्ट व अमिताभ बच्चन हे तिघेही एकाच चित्रपटात प्रथमच एकत्र येत आहेत. अमिताभ बच्चन यांनी रणबीरचे वडिल ऋषी कपूर यांच्यासोबत अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहेत. दोघांची जोडी असलेले चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. वडिल व मुलासोबत एकत्र काम करणाºया कलावंतात सामील होतील. दुसरीकडे रणबीरही अमिताभ यांच्यासोबत काम करण्याविषयी उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. रणबीरदिग्दर्शक आयान मुखर्जीचा रणबीर कपूरसोबत ड्रॅगन हा तिसरा चित्रपट असून यासाठी आयान व रणबीर चांगलीच मेहनत घेत आहे. या चित्रपटातील अ‍ॅक्शन दृष्यांसाठी रणबीरने विशेष प्रशिक्षण घेतले आहे. काही दिवसांपूर्वी याचे फोटो व्हायरल झाले होते. ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर मिळविणारी आलिया भट्ट ‘ड्रॅगन’मधून प्रथमच रणबीरसोबत दिसणार आहे. ड्रॅगन हा चित्रपटात रणबीरला सुपर पॉवर्स मिळाल्या आहेत. तो आगीशी खेळू शकतो असे कथानक असल्याने याला तात्पुरते ड्रॅगन हे नाव देण्यात आले आहे. मात्र या चित्रपटाचे कथानक उलगडण्यात आलेले नाही. रणबीर कपूर सध्या राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजय दत्तच्या बायोपिकची शूटिंग करतोय. यानंतर तो संजय गुप्ताच्या एका चित्रपटात काम करणार आहे. लवकरच रणबीर कपूर व कॅटरिना कै फ यांच्या प्रमुख भूमिका असलेला जग्जा जासूस हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.