Join us  

एका दिवसात ४० अंडी अन् ८ तास जिम, अशाप्रकारे राणा बनला बाहुबलीचा भल्लालदेव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 9:44 AM

भल्लालदेवची भूमिका आजही लोकांच्या मनात आहे. तसा म्हणायला प्रभास बाहुबलीचा मुख्य हिरो होता, पण राणाशिवाय या सिनेमाचा विचार केला जात नाही. 

साउथचा सुपरस्टार राणा दग्गुबाती आज (१४ डिसेंबरला) आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा करिअरचा एक मोठा प्रवास आहे. त्याने अनेक मोठ्या सिनेमांमध्ये कामे केली. बॉलिवूडमधीलही काही सिनेमांमध्ये तो दिसला. पण त्याला सर्वाधिक ओळख मिळाली ती 'बाहुबली'तील भल्लालदेवच्या भूमिकेतून. भल्लालदेवची भूमिका आजही लोकांच्या मनात आहे. तसा म्हणायला प्रभास बाहुबलीचा मुख्य हिरो होता, पण राणाशिवाय या सिनेमाचा विचार केला जात नाही. 

कशी तयारी झाली भल्लालदेवची भूमिका?

भल्लालदेव बनण्यासाठी राणीने फार मेहनत केली होती. आणि त्याने घेतलेली मेहनत पडद्यावर बघायला मिळाली. असे सांगितले जाते की,  भल्लालदेवच्या भूमिकेसाठी राणाला रोज ४ हजार कॅलरीज घ्याव्या लागत होत्या. इतक्या मोठ्या इनटेकसाठी राणा एका दिवसात ४० अंडी खात होता. त्यासोबतच जिममध्ये ८ तास घालवत होता.  एक सामान्य माणूस दिवसातून तीन वेळा जेवतो. पण भल्लालदेव बनण्यासाठी राणा एकाच दिवसात आठ वेळा जेवण करत होता. दर दोन तासांनी तो भातही खात होता.

राणाने सांगितले होते की, या भूमिकेसाठी त्याने आपलं वजन १०० किलोपर्यंत वाढवलं होतं. इतकं वजन झाल्यावर साधारणपणे कुणाचंही पोट बाहेर दिसेल. पण राणाने मेहनत घेतली. त्याने वजन तर वाढवलं पण ते केवळ आणि केवळ मसल्सच्या रूपात दिसलं. 

राणा दग्गुबातीने काही बॉलिवूड सिनेमात काम केलं. त्याने बिपाशा बसुसोबतही सिनेमा केला आणि अक्षय कुमारसोबतही केला. साउथमध्ये त्याने आपली एक वेगळी जागा निर्माण केली. त्याचा अॅक्शन अंदाज लोकांना अधिक भावतो. दरम्यान कोरोना काळात राणाने लग्नही केलं. सोशल मीडियावर त्याचे लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. 

टॅग्स :राणा दग्गुबतीबॉलिवूडTollywood