Join us

रमन राघव - 'UGLY' चित्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 14:21 IST

सुवर्णा जैनस्टार- 2 स्टार'रमन राघव 2.0' हा दिग्दर्शक अनुराग कश्यपचा सिनेमा. अनुरागची निर्मितीअसलेल्या 'उडता पंजाब'भोवती निर्माण ...

सुवर्णा जैनस्टार- 2 स्टार'रमन राघव 2.0' हा दिग्दर्शक अनुराग कश्यपचा सिनेमा. अनुरागची निर्मितीअसलेल्या 'उडता पंजाब'भोवती निर्माण झालेल्या वादानंतर अनुराग दिग्दर्शितहा सिनेमा रसिकांच्या भेटीला आलाय. हा सिनेमा रमन राघव नावाच्या सायकोसिरीयल किलर असलेल्या रियल व्यक्तीवर आधारित आहे. 1960 च्या दशकात रमनराघव नावाच्या सिरीयल किलरची मुंबईत दहशत पसरली होती.सिनेमात सायको सिरीयल किलर रामण्णाची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीनंसाकारलीय. नवाजुद्दीननं आपल्यादमदार अभिनयानं या भूमिकेला वेगळ्या उंचीवरनेऊन ठेवलंय. नवाजुद्दीनच्या अभिनयाच्या विविछ छटा तुम्हाला नक्कीचभावतील. तो तुम्हाला कधीही भितीदायक वाटेल. तर दुसरा सायको सिरीयलकिलरचा पाठलाग करणारा विकीकौशलनं साकारलेला राघवन हा पोलीसही तितकाच भावखाऊन जातो.या सिनेमात अमृता सुभाष, आणि मिस इंडिया अर्थ 2013 ची शोभिता धुलिपालाहिनं भूमिका साकारली.शोभिताचा हा पहिलाचा सिनेमा आहे. मात्र यादोघींच्याही भूमिकांमध्ये काही करण्यासारखं नसल्याचं वाटतं. अभिनेत्रींनासिनेमात दिलेलं कमी महत्त्व, वैविधत्येचा अभाव ही सिनेमाचा वीक पॉइंट ठरूशकतो.राम संपत यांनी सिनेमाला संगीत दिलंय.सिनेमात एकही गाणं नसून फक्त संगीतएखाद्या सीनच्याबॅकग्राऊंडला सुरु असतं. या संगीतामध्ये निराशा, राग व्यक्त झाला असलातरी सिनेमा बघताना ते संगीत कर्णकर्कश आणि डोईजड वाटतं.अनुराग कश्यपचा हा सिनेमा कसा असेल अशी उत्सुकता रसिकांना होती. हासिनेमा म्हणजे टिपिकल अनुराग कश्यप स्टाईल म्हणावा लागेल. हा सिनेमापाहताना तुम्हाला कधी त्याच्याच 'अग्ली' आणि 'गँग ऑफ वासेपूरचीही' आठवणयेईल. सिनेमात अतिरक्तरंजितपणा दाखवल्यासारखं वाटेल. मात्र ती कथेची गरजअसल्यानं त्याकडे काहीसं दुर्लक्ष करता येऊ शकतं.  हा सिनेमा पाहायचा असेल तर तो फक्त नवाजुद्दीनच्या अभिनयासाठी पाहावा असाच म्हणावं लागेल..सायको सिरीयल साकारताना नवाजुद्दीनं त्यात जीव ओतलाय.