Join us
Daily Top 2Weekly Top 5

​चित्रपट देण्याच्या बहाण्याने बेडरूममध्ये घेऊन गेला होता राम रहीम ; मॉडेल मरीना कुंवरचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 11:13 IST

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला बलात्कार प्रकरणात पंचकुलातील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्याच्याबद्दल रोज नवे खुलासे ...

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला बलात्कार प्रकरणात पंचकुलातील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्याच्याबद्दल रोज नवे खुलासे समोर येत आहेत. आता मॉडेल व अभिनेत्री मरीना कुंवर हिने राम रहीमवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राम रहीमने मला चित्रपटाची आॅफर दिली होती. केवळ इतकेच नाही तर मला बेडरूमपर्यंत घेऊन गेला होता, असे मरीनाने म्हटले आहे.राम रहीमने मला चित्रपटाची आॅफर दिली होती. यानंतर अनेकदा मीटिंगच्या बहाण्याने त्याने मला बोलवले. राम रहीमला सतत नशेत असायचा. मद्यपान व ड्रग्स घ्यायचा. बाबा मला मुलगी मुलगी बोलवायचा. पण त्याची नजर वेगळेच काही सांगायची. एकदा त्याने मला आलिंगन दिले. पण मला त्याचे ते वागणे खटकले. यानंतर त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे सुरु केले. एकदा तो मला बेडरूमपर्यंत घेऊन गेला आणि पैशाची अजिबात काळजी करू नकोस, असे त्याने मला सांगितले. तो मला पाहून सतत ‘यू आर माय लव्ह चार्जर’, हे गाणे गात असायचा, असे मरीनाने सांगितले.मरीनाने हनीप्रीतबद्दलही धक्कादायक खुलासे केलेत. मी राम रहीमला भेटायचे तेव्हा हनीप्रीत कायम त्याच्यासोबत असायची. हनीप्रीतसमोर तो सगळे काही करायचा. तिचा त्यावर काहीही आक्षेप नसायचा.  मात्र बाबा माझ्या अतिजवळ येत असल्याचे पाहून हनीप्रीतचा जळफळाट व्हायचा. ती माझा प्रचंड राग करायची. राम रहीम कधीच नॉर्मल नसायचा. प्रत्येकवेळी बोलताना तो डोक्यावरून हात फिरवायचा आणि मग सगळ्या शरिरावरून हात फिरवू पाहायचा, असेही मरीनाने म्हटले आहे.सहा महिन्यांपूर्वी रात्री १ च्या सुमारास मी बाबाच्या या वाईट कृत्यांबद्द्ल Tweet केले होते. पण यानंतर मला धमक्या येऊ लागल्या. त्यामुळे मी ते tweet डिलिट केले,असा दावाही तिने केला.ALSO READ : OMG : पडद्यावर खुलेल राम रहीमचे रहस्य, हनी प्रीतची भूमिकेत दिसेल राखी सावंत !मरीनाच्या बॉयफ्रेन्डनेही केले आरोपमरीनाच्या बॉयफ्रेन्डनेही हनीप्रीतवर अनेक आरोप केलेत. हनीप्रीत मला सतत फोन करायची. ती माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये येऊ इच्छित होती. ती मरीनाचा प्रचंड राग करायची, असा आरोप मरीनाच्या बॉयफ्रेन्डने केला आहे.