Join us
Daily Top 2Weekly Top 5

राम गोपाल वर्माने ‘या’ पोर्न स्टारसोबत बनविला चित्रपट, बोल्ड पोस्टर झाले व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 15:03 IST

दिग्दर्शक राम गोपाल वर्माने पुन्हा एकदा बोल्डनेसचा धमाका केला आहे. होय, रामगोपाल वर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ...

दिग्दर्शक राम गोपाल वर्माने पुन्हा एकदा बोल्डनेसचा धमाका केला आहे. होय, रामगोपाल वर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ’चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. चित्रपटाचे पोस्टर खूपच बोल्ड असून, सोशल मीडियावर ते वाºयासारखे व्हायरल होत आहे. रामगोपाल वर्माच्या या चित्रपटात प्रसिद्ध पोर्न स्टार मिया मिल्कोवा हिचे जलवे बघायला मिळणार आहेत. पोस्टरमध्ये मिया खूपच बोल्ड अंदाजात बघावयास मिळत आहे. राम गोपाल वर्मा यांनी मियासोबत काम करण्याचा अनुभव ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे.  राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर लिहिले की, ‘मिया... गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथची निर्मिती करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. मी कधीच सनी लिओनीबरोबर शूट केले नाही, परंतु गॉड सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ दरम्यान जो अनुभव मिळाला तो मी कधीच विसरणार नाही.’ राम गोपाल वर्माच्या या ट्विटनंतर मिया मिल्कोवा हिने तिच्या ट्विटर अकाउंटवरून चित्रपटाच्या शूटिंगबद्दल माहिती दिली. तिने ट्विटमध्ये लिहिले की, ‘भारतीय फिल्ममेकर राम गोपाल वर्मा यांनी माझ्यासोबत युरोप येथे गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ नावाचा एक व्हिडीओ शूट केला. सनी लिओनीनंतर मी दुसरी अ‍ॅडल्ड स्टार बनली जिने भारतीय फिल्ममेकरसोबत काम केले.  दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर येत्या १६ जानेवारी रोजी लॉन्च केला जाणार आहे. या चित्रपटाबद्दल सध्या प्रचंड चर्चा आहे. शिवाय सोशल मीडियावरही चित्रपटाचे पोस्टर वाºयासारखे व्हायरल होत आहेत. राम गोपाल वर्मा अ‍ॅडल्ट कंटेंटसोबत दुसºयांदा येत आहे. यापूर्वी ते ‘गन्स अ‍ॅण्ड थाइस’ या वेब सिरीजमधील बोल्ड कंटेंटमुळेही जबरदस्त चर्चेत होते.