Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘रकुल प्रीत सिंह, हे काय? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती!!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 14:18 IST

‘अय्यारी’ची अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर ट्रोलर्सची लक्ष्य ठरली आहे. होय, रकुलने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला अन् ...

‘अय्यारी’ची अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर ट्रोलर्सची लक्ष्य ठरली आहे. होय, रकुलने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला अन् दुस-याच क्षणाला ट्रोलर्सनी तिला घेरले.रकुलचा हा फोटो मॅक्सिम इंडियाच्या कव्हरपेजवर छापला गेला होता. रकुलने हाच फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पण तिचा हा बोल्ड फोटो अनेकांना रूचला नाही. काहींनी तिच्या या फोटोची तारीफ केली खरी, पण अनेकांनी तिला यावरून बरेच काही सुनावले. ‘तुझे डोके फिरलेय,’ असे एका ट्रोलरने म्हटले तर दुसºयाने तिच्यावर  पैशासाठी एक्स्पोज करण्याचा आरोप ठेवला. एका चाहत्याने ‘यापुढे मी तुझा फॅन नाही,’ असे सांगून नाराजी व्यक्त केले. आणखी दुसºयाने ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती,’ असे सांगून तिला लक्ष्य केले.'चाहत्यांच्या या प्रतिक्रिया ऐकून रकुल काहीशी भावूक झाली असेल, असा तुमचा अंदाज असेल तर तो साफ खोटा आहे. होय, कारण असे काहीही झाले नाही. ट्रोलर्सच्या या प्रतिक्रियांचा रकुलवर काहीही परिणाम झाला नाही. उलट ‘आणखी एक’ असे कॅप्शन देत तिने आपला आणखी असाच एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ALSO READ : अन् धोनीची ‘गर्लफ्रेन्ड’ बनता बनता राहिली रकुल प्रीत सिंह!लवकरच रकुलचा ‘अय्यारी’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. नीरज पांडे प्रदर्शित येत्या १६ फेबु्रवारीला हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होतो आहे. यात रकुल सिद्धार्थ मल्होत्राच्या अपोझिट दिसणार आहे. मनोज वाजपेयी आणि अनुपम खेर यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. रकुलने आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये ‘यारियां’ हा केवळ एकच चित्रपट केला आहे. यानंतर दीर्घकाळ ती बॉलिवूडमधून गायब झाली होती. या काळात रकुलला साऊथचे अनेक मोठे चित्रपट मिळाले. रकुल याबद्दल आनंदी आहे. इंडस्ट्रीत येऊन मला केवळ पाच वर्षे झालीत. पण या पाच वर्षात माझी  स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करू शकले, याचा मला आनंद आहे, असे ती अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती.