Join us  

'सरदार का ग्रँडसन' नंतर पुन्हा एकत्र काम करणार रकुल प्रीत सिंग आणि नीना गुप्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 2:08 PM

आशिष आर. शुक्ला दिग्दर्शित कॉमेडी थ्रिलरमध्ये नीना गुप्ता आणि रकुल प्रीत सिंग पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आशिष आर. शुक्ला दिग्दर्शित कॉमेडी थ्रिलरमध्ये दोन्ही अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. अद्याप, मात्र दोन्ही अभिनेत्रींनी यावर अधिकृत माहिती दिलेली नाही. या कॉमेडी थ्रिलरचे नाव अद्याप ठरलेले नसून  ऑक्टोबरच्या अखेरीस मुंबईत चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. 

नीना गुप्ता आणि रकुल प्रीत सिंग यांनी यापुर्वी 'सरदार का ग्रँडसन' या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या सिनेमात नीना गुप्ता, अर्जुन कपूर यांच्यासोबत रकुलप्रीत सिंग, जॉन अब्राहम आणि अदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत दिसले होते. या सिनेमामध्ये अर्जुनच्या आजीची भूमिका नीना गुप्ता यांनी साकारली होती. 

रकुल प्रीत सिंगने हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास,एस. शंकर आणि कमल हासन यांचा बहुप्रतिक्षित 'इंडियन २', शिवकार्तिकेयनचा साय-फाय ड्रामा 'अयलान', अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकरसोबत 'मेरे हसबंड की बीवी' आणि अजय देवगणसोबतचा 'दे दे प्यार दे' च्या सिक्वेलमध्ये ती दिसणार आहे. 

तर नीना गुप्ता यांची 'चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली' हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी Sony Liv वर प्रदर्शित झाला आहे. ही कथा प्रसिद्ध लेखिका अगाथा क्रिस्टी यांच्या द सिटाफोर्ड मिस्ट्री या कादंबरीवर आधारित आहे. तर निना गुप्ता 'पंचायत'मध्येही पाहायला मिळणार आहेत. २०२० मध्ये 'पंचायत'चा पहिला सिझन आला होता. प्रेक्षकांना हा सिझन खूपच आवडला.  तर याचा दुसरा सिझन २०२२ मध्ये रिलीज झाला. तर नुकतेच नीना यांनी ‘उंचाई’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. यामध्ये त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी आणि परिणिती चोप्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

टॅग्स :रकुल प्रीत सिंगनीना गुप्ताबॉलिवूड