Join us
Daily Top 2Weekly Top 5

Raksha Bandhan 2019 : ‘या’ पाच अभिनेत्रींचे भाऊ सांभाळतात कोट्यवधींचा व्याप, बॉन्डिंग आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 08:00 IST

आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने बॉलिवूडच्या काही टॉपच्या अभिनेत्रींच्या भावांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अभिनेत्रींचे हे भाऊ म्हणायला पडद्यामागे राहतात, पण कोट्यवधीचा व्याप सांभाळतात.

बॉलिवूड स्टार्स नेहमी कॅमे-यात कैद होतात. पण त्यांचे कुटुंब मात्र या ग्लॅमर दुनियेपासून कायम अलिप्त राहते. त्यामुळे अनेक स्टार्सच्या कुटुंबीयांबद्दल आपण फार कमी जाणतो. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने बॉलिवूडच्या काही टॉपच्या अभिनेत्रींच्या भावांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अभिनेत्रींचे हे भाऊ म्हणायला पडद्यामागे राहतात, पण कोट्यवधीचा व्याप सांभाळतात..

अनुष्का शर्मा आणि कर्णेश शर्मा

अनुष्का शर्मा बॉलिवूडची एक टॉपची हिरोईन आहे. तिचा भाऊ कर्णेश शर्मा हाही कमी नाही.  अनुष्का शर्माच्या ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसचा तो को-फाऊंडर आहे. अनुष्का अडचणीत असली की, कर्णेश तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. लग्नाआधी अनुष्का व विराट शर्मा यांच्यामते वाद झाला होता. हा वाद मिटवून अनुष्का व विराटला पुन्हा एकत्र आणण्याचे काम कर्णेश नेले. अंडर १९ रणजी क्रिकेट टीममध्येही त्याचा सहभाग होता.

ऐश्वर्या राय आणि आदित्य राय

ऐश्वर्या राय बच्चन हिला कोण ओळखत नाही. पण तिचा भाऊ आदित्य राय याच्याबद्दल फार कमी जाणतात. आदित्य राय मर्चेंट नेव्हीत इंजिनियर आहे. आदित्यने मॉडेल श्रीमा रायसोबत लग्न केले. त्या दोघांना एक मुलगा आहे. ऐश्वर्या चित्रपटसृष्टीत आल्यावर आदित्यनेही फिल्म इंडस्ट्रीत नशीब आजमावले होते. होय, ‘दिल का रिश्ता’ हा चित्रपट आदित्यनेच प्रोड्यूस केला होता. यात ऐश्वर्या प्रमुख भूमिकेत होती.

प्रियंका चोप्रा आणि सिद्धार्थ चोप्रा

बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी प्रियंका आणि तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा यांच्यात जबरदस्त बॉन्डिंग आहे. प्रियंका ग्लॅमर जगताची राणी आहे तर भाऊ आदित्य ग्लॅमरपासून चार हात लांबच आहे. सिद्धार्थ चोप्रा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कार्यरत आहे. त्याने स्विजरर्लंडमधून शेफचे ट्रेनिंग घेतले आहे. त्याचबरोबर पुण्यात त्याचा एक पब लाऊंज मगशॉट कॅफे आहे.

सुश्मिता सेन आणि राजीव सेन

दीर्घ काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेली अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन नुकताच विवाहबंधनात अडकला. सुश्मिताचा भाऊ पेशाने मॉडेल आहे.

परिणीती चोप्रा आणि सहज चोप्रा

परिणीती चोप्रा हिच्या भावांबद्दल  क्वचित लोक जाणतात. तिला शिवांग आणि सहज असे दोन भाऊ आहेत. तिचा भाऊ सहज चोप्राचा कुकीज बिजनेस आहे. 

टॅग्स :रक्षाबंधनऐश्वर्या राय बच्चनअनुष्का शर्मासुश्मिता सेन