अब होगा इन्साफ या चित्रपटात प्रेक्षकांना सनी लियोनीला देखील पाहाण्याची संधी मिळणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून जानेवारीपर्यंत या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. राखीने नुकत्याच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, सनी लियोनी बाबा राम रहिमला भेटायला गेली होती. एवढेच नव्हे तर तिने त्याच्यासमोर नृत्यदेखील सादर केले होते. त्यामुळे माझ्या चित्रपटात प्रेक्षकांना याविषयी देखील पाहायला मिळणार आहे. सनी लियोनी तर आमच्या चित्रपटात दिसणार नाही. पण तिच्या ड्युप्लिकेटवर एक आयटम साँग चित्रीत केले जाणार आहे.
राम रहिमच्या जीवनावर लवकरच अब होगा इन्साफ हा चित्रपट बनवत असून राखीचा भाऊ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे तर या चित्रपटात राखी हनप्रीतच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच दिल्लीमध्ये सुरू झाले असून 'अब होगा इन्साफ' असे या चित्रपटाचे टायटलही निश्चित झाले आहे. हनप्रीतची भूमिका साकारणारी राखी सावंत या चित्रपटात आयटम नंबरदेखील करणार आहे. डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला साध्वींवर केलेल्या बलात्कारप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याने त्याच्या आयुष्यात केलेले अनेक कांड राखी 'अब होगा इन्साफ' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवणार आहे.
Also Read : राखी सावंत म्हणतेय राम रहिमच्या खोलीत मी पाहिली होती ही धक्कादायक गोष्ट