Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘जो भगवान नही देता वो डॉक्टर देता हैं’ असे म्हणत राखी सावंतने करण जोहरची केली बोलती बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 21:31 IST

वादग्रस्त वक्तव्य करून नेहमीच चर्चेत राहणारी आयटम गर्ल राखी सावंत हिने तिच्या करिअरची सुरुवात ‘अग्निचक्कर’ या चित्रपटातून केली. मात्र ...

वादग्रस्त वक्तव्य करून नेहमीच चर्चेत राहणारी आयटम गर्ल राखी सावंत हिने तिच्या करिअरची सुरुवात ‘अग्निचक्कर’ या चित्रपटातून केली. मात्र राखी तिच्या फिल्मी करिअरपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत राहिली आहे. आज आम्ही राखीविषयीचा असाच एक किस्सा सांगणार आहोत. होय, प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरला जेव्हा राखीच्या ब्रेस्टविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याची अक्षरश: बोलती बंद झाली होती. या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे, असा त्याला प्रश्न पडला होता. होय, आपल्या तोंडपट्ट्यामुळे नेहमीच वादाच्या भोवºयात सापडणाºया राखीने तिच्या ब्रेस्टविषयी करण जोहरला असे काही उत्तर दिले की, त्याला काय बोलावे काहीच सुचत नव्हते. वास्तविक हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा राखी सावंत ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये पोहोचली होती. जेव्हा करणने तिला तिच्या ब्रेस्ट सर्जरीविषयी प्रश्न विचारला तेव्हा राखीने दिलेले उत्तर करणची बोलती बंद करणारे ठरले. तिने म्हटले ‘जो भगवान नही देता वो डॉक्टर देता हैं’!राखी सावंत एवढ्यावरच थांबली नाही तर तिने मीडियासमोरही काहीशा अशाच अंदाजात करणचा हा प्रश्न रेटून नेला. राखीने मीडियासमोर बोलताना म्हटले की, ‘बरेचसे लोक आहेत, जे ओठ, नाक, चेहरा यांसह हिप इम्प्लांट आणि ब्रेस्टची सर्जरी करतात. होय, मीदेखील केली आहे.’ यावेळी राखीने हेदेखील स्पष्ट केले की, मी एकदा नव्हे तर दोनदा ब्रेस्ट सर्जरी केली. पहिल्यांदा सर्जरी चुकीच्या पद्धतीने केली गेल्याने डॉक्टरांनी ब्रेस्टची दुसºयांदा सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी राखीने हेदेखील सांगितले होते की, ती हिप इम्प्लांटविषयी विचार करीत आहे.कदाचित राखीने आता हिप इम्प्लांट केले असावे. असो, सध्या राखी बलात्कारी गुरुमीत राम रहीम याच्या जीवनावर आधारित चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटात ती हनीप्रीतची भूमिका साकारत आहे.