Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंतने केला खळबळजनक खुलासा; म्हटले, ‘हनीप्रीतच्या प्रेमात वेडा झाला होता बाबा राम रहीम’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 21:44 IST

बलात्कारी गुरमित राम रहीम याच्यावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती केली जात असून, चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातही करण्यात आली आहे. चित्रपटात ...

बलात्कारी गुरमित राम रहीम याच्यावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती केली जात असून, चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातही करण्यात आली आहे. चित्रपटात बाबा राम रहीमची भूमिका संजय नेगी साकारत असून, हनीप्रीतच्या भूमिकेत आयटम गर्ल राखी सावंत असणार आहे. राखीने या चित्रपटाविषयी एक खळबळजनक वक्तव्य केले असून, त्यात तिने ‘राम रहीम हनीप्रीतच्या प्रेमात वेडा झाला होता’ असे म्हटले आहे. राखीचे हे वक्तव्य बरेच काही सांगून जात असून, या चित्रपटात बाबा आणि हनीप्रीतची लव्हस्टोरी दाखविली जाण्याची शक्यता आहे. हनीप्रीत बाबा राम रहीमची मानलेली मुलगी होती. परंतु समाजमाध्यमांमध्ये त्यांच्याविषयी ज्या काही चर्चा रंगत आहेत, त्यावरून त्यांच्यातील नाते नेमके कोणते? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान राम रहीमवर बनविण्यात येत असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘अब होगा इन्साफ’ असे निश्चित करण्यात आले आहे. या चित्रपटातील एका गाण्याची नुकतीच दिल्ली येथे शूटिंग करण्यात आली. शूटिंगदरम्यानचे काही फोटोज समोर आले असून, त्यामध्ये कॉन्ट्रोर्व्हशियल क्वीन राखी सावंतचा अंदाज बघण्यासारखा आहे. तर बाबा राम रहीमही तिच्या मागेपुढे फिरताना दिसत आहे. एकूणच या गाण्यात या दोघांचा रोमान्स दाखविण्यात येत असावा असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. दरम्यान, राखी सावंतने एबीपी न्यूजशी बोलताना म्हटले की, हनीप्रीतला मी गेल्या चार वर्षांपासून ओळखते. जेव्हा ती पहिल्यांदा बाबा राम रहीमकडे आली होती, तेव्हा ती ऐवढी अप-टू-डेट नव्हती. मात्र जशी ती मुंबईत आली, तसा तिचा अंदाज बदलत गेला. चांगले कपडे खरेदी करायला लागली. मी तिला मेकअप करायला शिकविले. केसांना कलर लावायचाही सल्ला दिला. पुढे बोलताना राखीने अतिशय खळबळजनक खुलासा केला, तिने म्हटले की, गुरमित राम रहीम हनीप्रीतच्या प्रेमात वेडा झाला होता. कारण जे हनीप्रीत सांगायची तेच बाबा करायचा. जर तिने त्याला दोन पावलं पुढे जायचे सांगितले तर बाबा तेवढीच चाल चालत असे. राखीने केलेल्या वक्तव्यानुसार, हनीप्रीतने बाबा राम रहीमला पूर्णपणे तिच्या जाळ्यात ओढले होते. बाबादेखील तिच्या सौंदर्याचा दिवाना झाला होता. त्याला हनीप्रीतशिवाय काहीच सूचत नसे. पुढेपुढे तर तो तिला प्रत्येक ठिकाणी घेऊन जात असे. त्यामुळेच दोघांमधील रोमान्सच्या बातम्या पुढे येऊ लागल्या. दरम्यान, बाबा राम रहीमच्या या चित्रपटात हनीप्रीत आणि बाबाच्या रोमान्सची स्टोरी दाखविली जाण्याची शक्यता आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.