Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rakhi Sawant Marriage : 'निकाह'नंतर राखी सावंत झाली फातिमा, पण आता 'ड्रामा गर्ल'ला सतावू लागलीये वेगळीच भीती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 10:34 IST

Rakhi Sawant Marriage : ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा चर्चेत आहे. कारण आहे तिचं लग्न. होय, बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी खानसोबत 'निकाह' करण्याच्या राखीच्या निर्णयाने पुन्हा एकदा सर्वांना हैराण केलं आहे.

Rakhi Sawant Marriage :   ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा चर्चेत आहे. कारण आहे तिचं लग्न. होय, बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी खानसोबत 'निकाह' करण्याच्या राखीच्या निर्णयाने पुन्हा एकदा सर्वांना हैराण केलं आहे. राखीने  तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. मी व आदिल आम्ही ७ महिन्यांपूर्वीच लग्न केलं होत, मात्र आदिलने माझ्यावर हे लग्न लपवण्यासाठी दबाव टाकला.  'निकाह'सोबत आम्ही कोर्ट मॅरेजही केलं, मात्र आत्तापर्यंत हे सगळं जगापासून लपवून ठेवलं होतं, असा खुलासा तिने केला आहे. आदिलसोबत निकाह केल्यानंतर राखीने फातिमा असं नामकरण केलं आहे. पण आता आदिलने राखीसोबत बोलणं थांबवलं आहे. आदिलने मला धोका दिल्याचं राखी म्हणत आहे. आता ही नवी काय भानगड आहे, ते जाणून घेऊ यात.

आता तो बोलत नाहीये...राखीने लग्न केल्याची बातमी येताच, अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्यात. पण यानंतर एका मुलाखतीत राखीने वेगळंच काही सांगितलं. ती म्हणाली, आदिलने मला धोका दिला आहे. त्याचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर आहे. लग्नानंतरही तो दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आदिलचं हे वागणं पाहूनच मी लग्नाबद्दल अख्ख्या जगाला सांगितलं. लग्नानंतर मी माझं नावही बदललं आहे. निकाहनंतर मी माझं नाव फातिमा ठेवलं आहे. लग्नाबद्दल लोकांना कळताच आता आदिल माझ्याशी बोलत नाहीये. त्याच्या व त्याच्या कुटुंबाकडून माझ्यावर दबाव टाकला जात आहे. 

पुढे ती म्हणाली, बहिणीचं लग्न होईपर्यंत आपलं लग्न लपवून ठेव, असं आदिल मला म्हणाला होता. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मी ‘बिग बॉस मराठी ४ ’ मध्ये गेल्यावर बाहेर अनेक गोष्टी घडल्या. मग मात्र माझा संयम संपला आणि मी लग्नाबद्दल खुलासा केला. मी घाबरली होते. तो माझ्यावर प्रेम करतो, पण मग लग्न झालंच नाही, असं का म्हणतोय मला माहित नाही. कदाचित त्याच्या कुटुंबाचा दबाव असावा. सकाळपासून तो माझ्यासोबत बोलत नाहीये. माझ्यासोबतच नेहमी असं का घडतं?इतकंच नाही, तर राखीने लव्ह जिहादकडेही इशारा केला आहे. मला आता भीती वाटतेय. जे सगळीकडे होतंय, तेच माझ्यासोबत होईल, अशी भीती मला वाटू लागली आहे, असं ती टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. दुसरीकडे आदिलने राखीसोबत लग्न केल्याचा इन्कार केला आहे.

 राखी अलीकडे ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. घरातील टॉप ५ सदस्यांमध्ये राखीने स्थान मिळवलं होतं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच राखी व तिचा बॉयफ्रेंड आदिल खानच्या लग्नाचे फोटो व्हायरल झालेत. यानंतर राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी व आदिल एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहे. तिच्या व्हायरल होणाऱ्या लग्नाच्या फोटोंमधील मॅरेज सर्टफिकेटवर २९ मे २०२२ अशी लग्नाची तारीख आहे. त्यामुळे राखीने सात महिन्यांपूर्वीच लग्न केलं आहे.

टॅग्स :राखी सावंतसेलिब्रिटीटिव्ही कलाकार