Join us

राकेश रोशन यांनी 'क्रिश ४'वर दिलं अपडेट, कधी सुरु होणार सिनेमाचं शूट? म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:46 IST

बजटचा प्रश्न होता पण त्यावर काढला तोडगा

हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) 'क्रिश ४' (Krrish 4) ची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. मात्र सिनेमाच्या तयारीला अद्याप सुरुवातही झालेली नाही. क्रिशचे तीनही भाग राकेश रोशन यांनीच दिग्दर्शित केले होते. पण आता चौथा भाग हा हृतिक स्वत:च दिग्दर्शित करणार आहे. सिनेमाच्या बजेटमुळे याची तयारी अजून सुरु झालेली नाही. आता राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी सिनेमाबद्दल अपडेट दिलं आहे. 

यशराज फिल्म्ससोबत राकेश रोशन यांनी हात मिळवले आहेत. यामुळे आता बजेटचा प्रश्न मिटला असल्याची चर्चा आहे. क्रिश ४ चं शूट कधी सुरु होणार आणि सिनेमात कधी रिलीज होणार यावर राकेश रोशन यांनी नुकतंच उत्तर दिलं आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत राकेश रोशन म्हणाले, "आता सिनेमाच्या स्क्रिप्टसाठी फारसा वेळ लागणार नाही. सर्वात मोठी अडचण बजेटची होती. पण आता एकूण खर्चाचा अंदाज लागला आहे. आम्ही शूटिंग सुरु करणार आहोत. पूर्ण जोरात याचं काम सुरु होणार आहे. पुढील वर्षी मध्यापर्यंत सिनेमाचं शूट सुरु होईल कारण सिनेमाच्या प्री प्रोडक्शनमध्ये जास्त वेळ लागणार आहे. सिनेमाला फ्लोरवर आणायला आम्हाला पूर्ण तयारी करावी लागेल."

तसंच सिनेमा २०२७ पर्यंत रिलीज होऊ शकतो अशी शक्यता आहे. इतकंच नाही तर सिनेमात तीन तीन अभिनेत्री असतील अशी चर्चा आहे. अभिनेत्री रेखा या देखील फ्रँचायझीमध्ये कमबॅक करणार आहेत. त्यांनी हृतिकच्या आजीची भूमिका साकारली होती. शिवाय प्रिती झिंटा आणि प्रियंका चोप्रा या दोघीही कमबॅक करणार का याकडे लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :राकेश रोशनक्रिश 4हृतिक रोशनबॉलिवूड