Join us  

सुशांत सिंग राजपूतमुळे राजकुमार रावने चित्रपटातून घेतली एक्झिट ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 9:41 AM

सुशांत सिंग राजपूत आणि राजकुमार राव यांच्या जोडीचा काय पो छे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटानंतर ...

सुशांत सिंग राजपूत आणि राजकुमार राव यांच्या जोडीचा काय पो छे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटानंतर प्रेक्षका त्यांना पुन्हा एकदा एकत्र बघण्यासाठी उत्सुक आहेत. राजकुमार राव आणि सुशांत सिंग राजपूत लवकरच नितेश तिवारी यांच्यासोबत दिसणार आहे. यामध्ये अशी माहिती मिळते की राजकुमार रावने या चित्रपटातून एक्झिट घेतली आहे. कारण त्याला चित्रपटात सेकंड लीड व्हायचे नाही. राजकुमार राव मीडियाशी बोलताना म्हणाला, ''काय पो छे !'' हा खरच स्पेशल चित्रपट होता मला आजही मेसेज येतायेत. मला सुशांतबरोबर पुन्हा एकदा काम करायचे आहे. मला विश्वास आहे की सुशांत लवकरच माझासोबत काम करेल. राजकुमारने पुढे असे ही सांगितले की त्याला अजून सुशांतसोबत काम करण्याची ऑफर आली नाही. त्यामुळे माझ्याबाबतीत ज्या चर्चा होतायेत त्याकेवळ अफवा आहेत.     राजकुमारने सांगितले, तो नितेश तिवारीच्या चित्रपटांचा फॅन आहे. त्यांचे चित्रपट रिलीज होण्याची मी वाट बघत असते. त्याला लवकरच नितेशसोबत काम करायचे आहे. सध्या राजकुमार हॉरर कॉमेडी 'स्त्री' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक करणार आहेत. या चित्रपटाचे लेखन राज आणि डिकेने केले आहे. चित्रपटाची निर्मिती डिनेश विजन, राज आणि डीके करणार आहेत. राज आणि डिके यांनी शोर इन द सिटी, गो गोआ गॉन आणि हॅप्पी एंडिंग सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यानंतर राजकुमार कंगना राणौतसोबत 'मेंटल’ चित्रपटात दिसणार आहे. प्रकाश कोवेलामुडी दिग्दर्शित हा चित्रपट एक सायकॉलॉजिक थ्रीलर आहे. कंगनाने याआधीही राजकुमार रावसोबत काम केले आहे. ‘क्वीन’ या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसली होती. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. आता ही जोडी पुन्हा एकदा ‘मेंटल’द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.