रजनीकांतची इच्छा, अभिनेता म्हणून नव्हे तर आध्यात्मिक व्यक्ती म्हणून मिळावी ओळख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 19:15 IST
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा आगामी सायंस फिक्शन 2.0च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यात तो एका वैज्ञानिकाची व रोबोटची भूमिका साकारत आहे. ...
रजनीकांतची इच्छा, अभिनेता म्हणून नव्हे तर आध्यात्मिक व्यक्ती म्हणून मिळावी ओळख
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा आगामी सायंस फिक्शन 2.0च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यात तो एका वैज्ञानिकाची व रोबोटची भूमिका साकारत आहे. मात्र वास्तविक जीवनात अभिनेता रजनीकांत स्वत: एक अभिनेता म्हणून नव्हे तर आध्यात्मिक व्यक्ती मानतो. रजनीकांत म्हणला, मी नाव व प्रसिद्धीपेक्षा आध्यात्मवादाला जास्त महत्त्व देतो कारण अध्यात्मिक शक्तीचा कुणीच सामना करू शकत नाही. याची तुलना कोणत्याही गोष्टीशी करता येत नाही. रजनीकांतची आत्मकथा ‘डिवाईन रोमांस’ या पुस्तकाचे तामीळ संस्करण ‘देवीगा कदाल’च्या लाँचिग प्रसंगी त्याने ही माहिती आपल्या चाहत्यांसमोर शेअर केली. रजनीकांत म्हणाला, ‘मी स्वत:ला अभिनेता म्हणून नव्हे तर एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून माझी ओळख असावी असे मला वाटते. माझ्या मते, आध्यात्मवाद पैसा, नाव, प्रसिद्धी यासर्वांपेक्षा वरचढ आहे. कारण आध्यात्मातून तुम्हाला शक्ती मिळते आणि या शक्तीचे मला आकर्षण आहे.’ रजनीकांतचे पुस्तक परमहंस योगानंद यांनी लिहले आहे. रजनीकांत यांने आपल्या जीवनाचे अनेक पैलू यावेळी उकलले. रजनीकांत म्हणाला, माझा भाऊ सत्यनारायण गायकवाड हा माझा पहिला गुरू आहे, त्यानी मी लहान असताना आध्यात्माशी माझी ओळख करून दिली. त्यांनी मला रामकृष्ण मीशन मध्ये पाठविले होते. माझे दुसरे गुरू रामकृष्ण परमहंस यांचा उल्लेख करेल. रजनीकांतच्या मते त्याला सामाजिक समस्यांची माहिती स्वामी दयानंद सरस्वती यांच्या कार्यातून माहिती झाली. रामकृष्ण मिशनद्वारे चालविण्यात येणाºया अनेक कार्याचा उल्लेखही त्यांनी केला. रजनीकांत नियमित हिमालयाच्या यात्रेवर जात असल्याचे सांगितले. हिमालय दिव्य रहस्ये असलेली जागा आहे असे मला वाटते असेही रजनीकांत म्हणाला. रजनीकांतचा आगामी चित्रपट २.० दिवाळीला रिलीज केला जाणार आहे. यात अक्षयकुमार नकारात्मक भूमिका साकारत असून रजनीकांत तिहेरी भूमिकेत दिसणार आहे.