रणबीर साकारणार राज कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 17:28 IST
ग्रेट शोमॅन राज कपूर यांच्या आयुष्यावर बायोपिक काढण्याचे ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचेच नाही तर संपूर्ण कपूर फॅमिलीचे स्वप्न ...
रणबीर साकारणार राज कपूर!
ग्रेट शोमॅन राज कपूर यांच्या आयुष्यावर बायोपिक काढण्याचे ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचेच नाही तर संपूर्ण कपूर फॅमिलीचे स्वप्न आहे आणि ताज्या बातमीनुसार, लवकरच हे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता आहे. होय, राज कपूर यांच्या बायोपिकची तयारी सुरु झाली आहे आणि या बायोपिकमध्ये रणबीर कपूर हा आपल्या आजोबांची भूमिका साकारणार आहे. आर. के. बॅनरखाली या बायोपिकची तयारी सुरु झाली आहे. सूत्रांचे मानाल तर, ऋषी कपूर हे या चित्रपटाचे निर्माते असतील आणि रणबीर या बायोपिकमध्ये त्याचे आजोबा राज कपूर यांची भूमिका साकारताना दिसेल. राज कपूर यांच्याबद्दलचे रणबीरचे आदर, प्रेम लपलेले नाही. रणबीर अनेकदा आजोबांच्या गेटअपमध्ये दिसला आहे. लवकरच पडद्यावर रणबीरला आजोबांची भूमिका जगायला मिळणार आहे...तेव्हा आॅल दी बेस्ट रणबीर!