Join us

बिकिनी अवतारात दिसली राज बब्बरची होणारी सून; गोव्यात करीत आहे हॉलिडे एन्जॉय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 18:54 IST

‘जाने तू या जाने ना, एक दीवाना था आणि धोबीघाट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता प्रतीक बब्बरची होणारी पत्नी ...

‘जाने तू या जाने ना, एक दीवाना था आणि धोबीघाट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता प्रतीक बब्बरची होणारी पत्नी सान्या सागर भलतीच चर्चेत आहे. सध्या सान्या गोवा येथे व्हेकेशन एन्जॉय करीत असून, येथील तिचे काही बिकिनी फोटोज् सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अभिनेता तथा नेता राज बब्बर यांचा मुलगा प्रतीकशी सान्याचा जानेवारी २०१८ मध्ये लखनऊ येथे साखरपुडा झाला आहे. अद्यापपर्यंत लग्नाची तारीख निश्चित नसली तरी, रिपोर्ट्सनुसार लवकरच हे दोघे लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे. राज बब्बर यांचे पहिले लग्न नादिरा बब्बर यांच्याशी झाले होते. त्यांना आर्य बब्बर आणि जूही बब्बर अशी दोन मुले आहेत. तर दुसºया पत्नीपासून राज यांना प्रतीक बब्बर नावाचा मुलगा आहे. आर्य बब्बर याने २०१६ मध्ये आपली लहानपणीची मैत्रीण जॅसमिन पुरी हिच्याशी लग्न केले. तर प्रतीकचे नाव सान्या अगोदर एमी जॅक्सन आणि अमायरा दस्तूर यांच्याशी जोडले गेले होते. रिपोर्ट्सनुसार, प्रतीक आणि सान्या एकमेकांना गेल्या आठ वर्षांपासून ओळखतात. दोघे साखरपुड्याच्या सहा महिने अगोदर रिलेशनशिपमध्ये होते. सान्या लेखिका आणि दिग्दर्शिका आहे. तिने गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटी आॅफ लंडन येथून पदवीचे तर लंडन फिल्म अकॅडमी येथून फिल्ममेकिंगचे शिक्षण घेतले. सान्याने ‘द लास्ट फोटोग्राफ’मध्ये सहनिर्माती म्हणून काम केले आहे. याव्यतिरिक्त तिने सलमा हायकच्या ‘११ आॅवर’ या शॉर्ट फिल्ममध्ये प्रॉडक्शन  रनरचे काम केले.