रईसची विघ्ने संपेनात! शाहरुख संकटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 17:13 IST
अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट ‘रईस’ंची विघ्ने संपण्याची चिन्हे नाहीत. प्रदर्शनापूर्वी अनेक विरोधांना सामोरे जावे लागणाºया चित्रपटाविरुद्ध आता, अब्दुल ...
रईसची विघ्ने संपेनात! शाहरुख संकटात
अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट ‘रईस’ंची विघ्ने संपण्याची चिन्हे नाहीत. प्रदर्शनापूर्वी अनेक विरोधांना सामोरे जावे लागणाºया चित्रपटाविरुद्ध आता, अब्दुल लतीफचा मुलगा मुश्ताक याने कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. यामुळे शाहरुख संकटात आला आहे. रईस हा चित्रपट गुजरातमधील माफिया अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. शाहरुख ही भूमिका साकारत आहे. एप्रिल २०१६ मध्ये अब्दुल लतीफचा मुुलगा मुश्ताक याने या चित्रपटाद्वारे आपल्या वडिलांची प्रतिमा खराब करण्यात येत असल्याचे सांगून गुजरात उच्च न्यायालयात १०० कोटींचा दावा दाखल केला होता. गुजरात उच्च न्यायालयाने मुश्ताकला हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कोणत्याही निर्णयाप्रत येण्याऐवजी थांबण्यास सांगितले होते. मुश्ताक हा चित्रपट न पाहताच रईसविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या बेतात आहे. एका वृत्तपत्राला सांगताना मुश्ताकने आपण ट्रेलर पाहिला असून, निर्माते काय म्हणतात याच्याशी आपणास काहीही देणेघेणे नसल्याचे सांगितले. हा चित्रपट आपल्या वडिलांच्या जीवनावर आधारित असून, आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्याने म्हटले.मुश्ताकच्या कायदेशीर सूत्रानुसार रईसच्या निर्मात्यांंनी त्यांच्याशी संपर्क साधला होता, मात्र ज्या पद्धतीने अब्दुल लतीफ यांची प्रतिमा दाखविण्यात आली आहे, त्यानुसार ते संतुष्ट नाहीत. लतीफ यांना चित्रपटात गुंड दाखविण्यात आले आहे. निवडणूक जिंकणे किंवा सामाजिक कामासारख्या चांगल्या बाजूंचा उल्लेख नाही. अब्दुल लतीफ यांची प्रतिमा मलीन करण्याचा यात प्रयत्न करण्यात आला आहे. मुश्ताक यांचे वकील इलियास पठाण यांच्या अनुसार लतीफ यांच्या पत्नीचीही प्रतिमा वेगळी दाखविण्यात आली आहे. हिजाब परिधान न करताच दरियापुरी भागात दारु विक्री करताना दाखविण्यात आले आहे. स्थानिक मुस्लिम समुदायाने यावर नाराजी जाहीर केली असून, न्यायालयात दाद मागितली आहे.