Join us

राहुल शर्मा-अक्षय कुमारची क्रिकेट मॅच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 08:46 IST

 असिन आणि राहुल शर्मा यांचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले आणि बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आणि दिल्लीतील घरी ...

 असिन आणि राहुल शर्मा यांचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले आणि बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आणि दिल्लीतील घरी येणे जाणे सुरू केले आहे. रवीना टंडननेही नुकतीच असीनच्या घरी जाऊन भेट घेतली.तर असीनने नुकताच अक्षय कुमार आणि तिचे पती राहुल शर्मा सोबत क्रिकेट खेळतानाचा फोटो पोस्ट केला आहे. अक्षय सध्या ‘रोबोट २’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने टिवटरवर फोटो पोस्ट केला होता,‘ आफ्टर अ हार्ड वीक आॅन ‘रोबोट २’ कान्ट टेल यू विल हाऊ गुड इट फिल्स टू एन्जॉय अ मॅच विथ माय किड्स अ‍ॅण्ड फ्रेंड्स इन दिल्ली टष्ट्वेंटी टष्ट्वेंटी.’रोबोट २ ची शूटिंग सध्या दिल्लीतच सुरू असून रजनीकांतसोबत तो दिसणार आहे. यात अक्षय निगेटिव्ह भूमिका करणार आहे. मायक्र ोमॅक्सचा को-फाऊंडर राहुल शर्मा आणि असीनचा अक्षय हा अत्यंत जवळचा मित्र आहे. अक्षयला लग्नाचे सर्वांत अगोदर आमंत्रण मिळाले होते.