Join us

Raees रिलिज झाल्यानंतर महिरा खान झाली नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 21:58 IST

पाकिस्तानी कलाकारांमुळे ‘ऐ दिल हैं मुश्किल’ नंतर ‘रईस’ सिनेमाही वादाच्या भोवºयात अडकण्याची शक्यता वर्तविली जात होती. कारण ‘ऐ दिल ...

पाकिस्तानी कलाकारांमुळे ‘ऐ दिल हैं मुश्किल’ नंतर ‘रईस’ सिनेमाही वादाच्या भोवºयात अडकण्याची शक्यता वर्तविली जात होती. कारण ‘ऐ दिल हैं मुश्किल’मधील पाकिस्तानी कलाकार फवाद खान याच्या भूमिकेवर आक्षेप घेत सिनेमाच्या रिलिजवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेल्याने, ‘रईस’मधील माहिरा  खानच्या भूमिकेबाबतही नवे वादळ निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. परंतु ‘रईस’ ठरलेल्या तारखेलाच रिलिज व्हावा यासाठी रईसच्या टीमने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन प्रदर्शनाचा मार्ग सुकर केला. परंतु पाकिस्तानी कलाकार माहिरा खान हिला प्रमोशनपासून सर्वच बाबतीत दूर ठेवल्याने ती नाराज असल्याचे समजते. ‘रईस’च्या शुटिंगदरम्यान शाहरूखसोबत माहिरा खानशाहरूख खान एकटाच रईस सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. फक्त कपिल शर्माच्या सेटवरच माहिराची झलक पाहायला मिळाली होती. माहिरा खान शाहरूख खान आणि टीमसोबत प्रमोशनसाठी जाऊ शकणार म्हणून तिने ‘स्काईप’वरून ती रसिकांना हा सिनेमा पाहण्याचे आवाहन केले होते. मात्र आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर माहिरा खान हिच्या मनातील खदखद आता बाहेर येत आहे. ती शाहरूखसह सिनेमाच्या संपुर्ण टीमवरच नाराज असल्याचे समजते. आपल्याला सिनेमापासून लांब ठेवण्यात आल्याची खंत तिने एका पाकिस्तानी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे. या सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे आणि सगळ्यांचे आभार मानते. मात्र प्रमोशनपासून आतापर्यंत मला दूर ठेवल्याचे वाईट वाटतेय. सिनेमात मी अभिनेत्री आहे म्हणून हा सर्व विवाद आहे. मलासुद्धा हा सिनेमा प्रमोट करायचा आहे. शाहरु खसोबत बसून मीदेखील मुलाखती द्यावा, सिनेमाविषयी बोलावे, असे मला वाटते. मुळात हा माझा हक्कच आहे. कारण सिनेमा माझा आहे. मला असे वाटतेय की, माझ्या देशाने हा सिनेमा बघावय, प्रत्येकाने बघावा, पण असे घडले नसल्याचे ती म्हणाली. ‘रईस’मधील शाहरूख, माहिराची अदापुढे बोलताना तिने सांगितले की, माझे मित्र मला सांगतात की, आता सगळे विसरु न जा. मी प्रयत्नसुद्धा केला. पण विसरु  शकत नाही. माझी दोन वर्षांची मेहनत सगळ्यांनी बघावी, असे मला वाटते. पण मी यात अपयशी ठरली आहे. कारण सध्या रईसमध्ये फक्त आणि फक्त बादशाह शाहरूख खान हाच हायलाईट होत असल्याने माहिरा कुठे आहे? हा प्रश्न मला सतावत असल्याचेही ती म्हणाली.