होय, खुद्द ऋषी कपूर यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर याची घोषणा केली आहे. आगीत जळून खाक झालेल्या आर. के. स्टुडिओचा एक फोटो शेअर करत त्यांनी ही घोषणा केली. ‘१६ सप्टेंबर २०१७. भयंकर आगीत खाक़ वण्र मिटणारे नाहीत. पण स्टेट आॅफ द आर्ट स्टुडिओ उभारला जाणार...’असे tweet त्यांनी केले आहे.
ALSO READ : आर. के. स्टुडिओ अग्निकांडानंतर ऋषी कपूर भावूक ; सगळ्या आठवणी नष्ट झाल्या, मला अजूनही विश्वास बसत नाहीयं!
ऋषी कपूर यांनी आर. के. स्टुडिओचा एक जुना ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोही शेअर केला आहे. हा चित्रपट ‘आवारा’ या चित्रपटाच्या आठवणी ताज्या करणारा आहे. ‘१९५०...आर. के. स्टुडिओ स्टेज नंबर १. ‘आवारा’सोबत दसºयाच्या मुहूर्तावर उद्घाटनासाठी तयार केला जात आहे. ड्रीन सीक्वेंसचे शूटींग सुरु होणार आहे,’ असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे.
१९५१ मध्ये मधला ‘आवारा’, १९५३ मध्ये आलेला ‘आह’, १९५५ मधला ‘श्री 420’, त्यानंतर आलेले ‘जागते रहो’, ‘जिस देश मे गंगा बहती है’ ,‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेम रोग’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘हिना’, ‘प्रेम ग्रंथ’ अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती आर. के. स्टुडिओमध्ये झाली आहे.