पुन्हा उभा राहणार आर. के. स्टुडिओ! ऋषी कपूर यांनी सोडला संकल्प!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 12:45 IST
गत १६ सप्टेंबरला मुंबईतील सर्वाधिक जुन्या आणि बॉलिवूडच्या अनेक स्मृतींचा साक्षीदार असलेला आर.के. स्टुडिओ आगीत जळून खाक झाला. स्टुडिओमध्ये ...
पुन्हा उभा राहणार आर. के. स्टुडिओ! ऋषी कपूर यांनी सोडला संकल्प!!
गत १६ सप्टेंबरला मुंबईतील सर्वाधिक जुन्या आणि बॉलिवूडच्या अनेक स्मृतींचा साक्षीदार असलेला आर.के. स्टुडिओ आगीत जळून खाक झाला. स्टुडिओमध्ये उभारलेल्या एका रिअॅलिटी शोच्या सेटवर शॉर्ट सर्किट झाले आणि यातून उठलेल्या ठिगणीतून अख्खा आर. के. स्टुडिओ राख झाला. आर. के. स्टुडिओला आगीच्या ज्वालांनी वेढलेले पाहून अनेकांचे हृदय हळहळले. या स्टुडिओची मालकी असलेले ऋषी कपूर तर कमालीचे भावूक झाले. वडिल राज कपूर यांनी मोठ्या कष्टाने उभारलेल्या स्टुडिओची राखरांगोळी होताना पाहून त्यांना गलबलून आले. ‘हा स्टुडिओ नव्हता तर अनेक आठवणींचा खजिना होता. आर. के. फिल्म्सच्या अनेक हिरो-हिरोईनचे कॉस्च्युम याठिकाणी जतन करून ठेवले होते. हा सगळा ठेवा जळून खाक झाला आहे, हे अधिक दु:खदायी आहे,’ अशा शब्दांत ऋषी कपूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. पण कदाचित आता ते या दु:खातून सावरले आहेत. केवळ सावरलेच नाही तर या स्टुडिओला पुन्हा उभे करण्याचा मनोदय त्यांनी केला आहे. तेही वेगळ्या रूपात. होय, खुद्द ऋषी कपूर यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर याची घोषणा केली आहे. आगीत जळून खाक झालेल्या आर. के. स्टुडिओचा एक फोटो शेअर करत त्यांनी ही घोषणा केली. ‘१६ सप्टेंबर २०१७. भयंकर आगीत खाक़ वण्र मिटणारे नाहीत. पण स्टेट आॅफ द आर्ट स्टुडिओ उभारला जाणार...’असे tweet त्यांनी केले आहे. ALSO READ : आर. के. स्टुडिओ अग्निकांडानंतर ऋषी कपूर भावूक ; सगळ्या आठवणी नष्ट झाल्या, मला अजूनही विश्वास बसत नाहीयं!ऋषी कपूर यांनी आर. के. स्टुडिओचा एक जुना ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोही शेअर केला आहे. हा चित्रपट ‘आवारा’ या चित्रपटाच्या आठवणी ताज्या करणारा आहे. ‘१९५०...आर. के. स्टुडिओ स्टेज नंबर १. ‘आवारा’सोबत दसºयाच्या मुहूर्तावर उद्घाटनासाठी तयार केला जात आहे. ड्रीन सीक्वेंसचे शूटींग सुरु होणार आहे,’ असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे.१९५१ मध्ये मधला ‘आवारा’, १९५३ मध्ये आलेला ‘आह’, १९५५ मधला ‘श्री 420’, त्यानंतर आलेले ‘जागते रहो’, ‘जिस देश मे गंगा बहती है’ ,‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेम रोग’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘हिना’, ‘प्रेम ग्रंथ’ अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती आर. के. स्टुडिओमध्ये झाली आहे.