ए. आर. रहमानच्या ‘उर्वशी-उर्वशी’चे ‘रिइमॅजिन्ड व्हर्जन’ तुम्ही ऐकले का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 14:12 IST
trump aana take it easy sings a r rahman in 2017 update of urvasi urvasi: a r rahman: urvasi urvasi: दोन दशकांनंतरही ए. आर. रहमान याच्या ‘उर्वशी-उर्वशी’ या लोकप्रीय गाण्याची जादू ओसरलेली नाही. होय, या गाण्याचे नवे व्हर्जन सध्या प्रचंड गाजतेय. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘कधलन’ या चित्रपटातील या सुप्रसिद्ध गाण्याचे ‘रिइमॅजिन्ड व्हर्जन’ सोशल मीडियावर जारी केले आहे.
ए. आर. रहमानच्या ‘उर्वशी-उर्वशी’चे ‘रिइमॅजिन्ड व्हर्जन’ तुम्ही ऐकले का?
दोन दशकांनंतरही ए. आर. रहमान याच्या ‘उर्वशी-उर्वशी’ या लोकप्रीय गाण्याची जादू ओसरलेली नाही. होय, या गाण्याचे नवे व्हर्जन सध्या प्रचंड गाजतेय. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘कधलन’ या चित्रपटातील या सुप्रसिद्ध गाण्याचे ‘रिइमॅजिन्ड व्हर्जन’ सोशल मीडियावर जारी केले आहे. ‘टेक इट इझी उर्वशी...’ अशा आशयाच्या या गाण्यामधून रहमान ‘नोटाबंदी’च्या निर्णयानंतर प्रेक्षकांना ‘टेक इट इझी’ म्हणतो आहे. रहमानच्या या गाण्यात डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्या नावांचाही उल्लेख आहे. या गाण्यांत बहुतांश तामिळ शब्द आहेत. त्यामुळे ते कळत नसले तरी या गाण्याची चाल मात्र सगळ्यांनाच भावेल अशी आहे. काही दिवसांपूर्वी रहमानने ‘उर्वशी-उर्वशी’ या गाण्याच्या ‘रिइमॅजिन्ड व्हर्जन’साठी काही नव्या व हटके ओळी सुचवण्याचे आवाहन केले होते. रहमानने सोशल मीडियावर केलेल्या या आवाहनाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. या ओळी सुचवतांना कृपया हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प शिवाय नोटबंदी हे मुद्दे दूर ठेवा, असेही रहमानने म्हटले होते. पण कदाचित रहमान स्वत:च या मुद्यांकडे दुर्लक्ष करू शकला नाही. या तिन्ही मुद्यांचा समावेश त्याने आपल्या ‘रिइमॅजिन्ड व्हर्जन’मध्ये केलायं. शिवाय चाहत्यांनी सुचवलेल्या ओळींची, शब्दांची निवड करत रेहमानने हे ‘रिइमॅजिन्ड व्हर्जन’ तयार केले आहे.गायक सुरेश पीटर्स आणि संगीतकार रंजीत बरोत यांच्या सुरेल साथीने गायलेल्या हे गाणे तुम्हीही एकदा तरी ऐकायलाच हवे. चला तर मग ... }}}}‘कधलन’चे तामिळ भाषेतील गाणे प्रचंड हिट झाल्यानंतर ‘हमसे है मुकाबला’ या चित्रपटात ते हिंदी डब झाले होते. प्रभूदेवा आणि त्याचे मित्र बसच्या छतावर थिरकताना या गाण्यात दिसले होते. हे गाणे त्यावेळी लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते.