आर. माधवनला कोर्टाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 17:45 IST
जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी अभिनेता आर. माधवन याला मद्रास उच्च न्यायालयाने नोटीस बजावले आहे. डिंडिगुल जिल्ह्यात माधवनने जमीन खरेदी केली ...
आर. माधवनला कोर्टाची नोटीस
जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी अभिनेता आर. माधवन याला मद्रास उच्च न्यायालयाने नोटीस बजावले आहे. डिंडिगुल जिल्ह्यात माधवनने जमीन खरेदी केली आहे. याच जमिनीला लागून असलेल्या कालव्यावर अवैध कब्जा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने आज मंगळवारी माधवनला नोटीस बजावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ११ जुलैला होणार आहे.