Join us

राणी थकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 12:26 IST

रा णी मुखर्जीचे दिवाळी सेलिब्रेशन फारच दणक्यात सुरू होते. दिवाळीच्या काळात रोज ती वेगवेगळ्या दिवाळी पाटर्य़ांना मोठय़ा उत्साहात हजेरी ...

रा णी मुखर्जीचे दिवाळी सेलिब्रेशन फारच दणक्यात सुरू होते. दिवाळीच्या काळात रोज ती वेगवेगळ्या दिवाळी पाटर्य़ांना मोठय़ा उत्साहात हजेरी लावत होती. आपण प्रेग्नंट असून आता आराम केला पाहिजे या गोष्टीचा तिला जणू विसरच पडला होता. याचा परिणाम शेवटी व्हायचा तोच झाला. तिला खुप जास्त थकवा जाणवत होता त्यामुळे गायनॅककडे गेले असता त्यांनी तिला सक्त आराम करण्याचा सल्ला दिला आणि एका दिवसासाठी तिला अँडमीट करून घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक दिवस अँडमीट केल्यानंतर डॉक्टरांनी तिला डीसचार्ज दिला परंतु घरी बाळासाठी रूम तयार करण्याचे काम चालू असल्याने राणीने हॉस्पीटलमध्येच राहणे पसंत केले.