Join us

24 तासांत ‘बेफ्रिके’ झाला कोट्यधीश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 13:18 IST

केवळ 24 तासांत बेफ्रिकेच्या ट्रेलरला 1 कोटी लोकांनी पाहिले असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही आकडेवारी फक्त ट्विटरची असल्याचे सांगण्यात आले आहे.

आदित्य चोपडा दिग्दर्शित ‘बेफ्रिके ’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. रणवीर सिंग व वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर  अलीकडे पॅरिसच्या आयफेल टॉवरवर रिलीज करण्यात आला. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर केवळ 24 तासांत तो एक कोटी लोकांनी पाहिल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी फक्त टिष्ट्वटरची असल्याचे सांगण्यात येत आहे. बºयाच वर्षांनंतर  आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शनात कमबॅक केलेले आहे. ‘बेफ्रि के’च्या प्रमोशनमध्ये कुठलीही कमतरता राहू नये, हाच त्यांचा प्रयत्न आहे. यामुळेच त्यांनी ट्रेलर रिलीजसाठी आयफेल टावरची निवड केली. रणवीर  व वाणीच्या चित्रपटातील किसींग सीन्सची चर्चा घडवून आणली आणि आता ‘बेफ्रि के’ ट्रेलर 24 तासांत एक कोटी लोकांनी पाहिल्याचा दावा केला गेला. येत्या दिवसांत ‘बेफ्रि के’च्या प्रमोशनसाठी आणखी काय काय केले जाते, तेही बघूच. }}}} ">http://">http://