दीपिका पादुकोण ऐवजी कॅटरिना कैफ साकारणार पी.व्ही. सिंधुची भूमिका ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 15:45 IST
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक चित्रपट बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. सध्या बॅडमिंटन पटू पी. व्ही. सिंधुच्या आयुष्यावर आधारित चित्रपट मोठ्या पडद्यावर ...
दीपिका पादुकोण ऐवजी कॅटरिना कैफ साकारणार पी.व्ही. सिंधुची भूमिका ?
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक चित्रपट बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. सध्या बॅडमिंटन पटू पी. व्ही. सिंधुच्या आयुष्यावर आधारित चित्रपट मोठ्या पडद्यावर साकारण्याची तयारी सुरु आहे. ऑलिम्पिंकमध्ये देशाला सिल्वर मेडल मिळवून देणाऱ्या पी. व्ही. सिंधुच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करण्यात येतो आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अनुराग कश्यप सिंधुच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवण्याची तयारी सुरू केली आहे. सिंधुची भूमिका साकारण्यासाठी कॅटरिना कैफला अप्रोच करण्यात आला आहे. तर कॅटरिना कैफला चित्रपटाची स्क्रिप्ट सुद्धा आवडली आहे. मात्र अजून तिने चित्रपटात काम करण्यासाठी होकार नाही दिला. सगळे जळून आले तर पी.व्ही. सिंधुची भूमिका मोठ्या पडद्यावर कॅटरिना कैफ साकारताना दिसू शकते. ALSO READ : LEAK : सलमान खान व कॅटरिना कैफचा इंटिमेट फोटो होतोय वेगाने व्हायरल ! बघितला नसेल तर इथे बघा!!याआधी ही भूमिका दीपिका पादुकोण साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र आता या चित्रपटासाठी कॅटरिनाचे नावसमोर येतेय. दीपिकाने नुकतेच तिचा आगामी चित्रपट पद्मावतीचे शूटिंग पूर्ण केले आहे. बॅडमिंटन पटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर बनत असलेल्या चित्रपटात सायनची भूमिका श्रद्धा कपूर साकारणार आहे. सध्या याचित्रपटातसाठी सायना बॅडमिंटनची प्रॉक्टिस करते आहे. बॅटमिंटनच्या कोर्टवर ती चांगलाच घाम गाळते आहे. ती आपले बॅडमिंटनचे ट्रेनिंग कधी मिस नाही करत तसेच ती या चित्रपटाचा भाग बनणे एन्जॉय करत असल्याचे श्रद्धाने सांगितले होते. याआधी मिल्खा सिंग, मेरी कॉम, सचिन तेंडुलकर आणि एम. एस. धोनी या खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्यात आले होते. बॉक्स ऑफिसवर याचित्रपटांना पसंतीसुद्धा मिळाली. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर बायोपिकचा ट्रेंड बनणे सुरु झाले आहे.