Join us  

Pulwama Terror Attack : बॉलिवूड स्तब्ध! असा व्यक्त केला संताप!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 1:51 PM

जम्मू -काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात  सीआरपीएफचे ३९ जवान शहीद झाले. या हल्ल्याने देशाला हादरवून सोडले आहे. हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे.  देशातही संतापाची लाट उसळली आहे. बॉलिवूडनेही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

जम्मू -काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात  सीआरपीएफचे ३९ जवान शहीद झाले. या हल्ल्याने देशाला हादरवून सोडले आहे. हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे.  देशातही संतापाची लाट उसळली आहे. बॉलिवूडनेही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.बॉलिवूडच्याअनेक सेलिब्रिटींनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत, या भ्याड हल्ल्याची निंदा केली आहे. सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार, प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट, स्वरा भास्कर अशा अनेकांनी सोशल मीडियावर हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

 आमच्या कुटुंबाना वाचवण्यासाठी शहिद झालेल्या माझ्या प्रिय देशाचे जवान आणि   त्यांच्या कुटुंबीयांसाठी माझे हृदय तुटतयं, असे ट्वीट सलमान खान याने केलेय.

पुलवामामधल्या दहशतवादी हल्ल्याने मी पूर्णपणे हादरले. द्वेष हे उत्तर असूच शकत नाही,असे  प्रियंका चोप्राने म्हटले आहे.

रणवीर सिंगनेही या हल्ल्याची निंदा केली. पुलवामामध्ये शहिद झालेल्या जवानांना माझी श्रद्धांजली आहे. दु:खासोबतच संतापाने मन भरून आले आहे, असे रणवीरने म्हटले आहे.

 ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात जवानाची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल यानेही शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुलवामा दशवादी हल्ल्याची बातमी वाचून मला खूप मोठा धक्का बसला. या हल्ल्यात जखमी जवानांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारावी यासाठी मी प्रार्थना करतो, असे ट्वीट विकीने केले आहे. 

पुलवामा दहशतवादी हल्ला भ्याड कृत्य आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांप्रति सांत्वना व्यक्त करते, असे आलिया भट्टने म्हटले आहे.

दिग्दर्शक शेखर कपूर यांनी या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला.  हे कसे घडू शकते, इतका निगरगट्टपणा. आपण याचे उत्तर कसे देणार? असे घडूच नये किंवा याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ठोस काही करायलाचं हवे, असे त्यांनी लिहिले.

अभिनेता अजय देवगन, अक्षय कुमार, शाहिद कपूर, दिग्दर्शक करण जोहर यांनी देखील शहीदांना श्रद्धांजली वाहत जखमी जवानांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. 

टॅग्स :पुलवामा दहशतवादी हल्लाबॉलिवूडसलमान खानविकी कौशलप्रियंका चोप्रा