Join us

‘गोलमाल अगेन’ मधील भूमिकेविषयी परिणिती चोपडाने केला मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 22:02 IST

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोपडा सध्या ‘सातवे आसमान’ वर आहे. कारण तिला गोलमाल फ्रेंचाइजीच्या ‘गोलमाल अगेन’मध्ये संधी मिळाली आहे; मात्र ...

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोपडा सध्या ‘सातवे आसमान’ वर आहे. कारण तिला गोलमाल फ्रेंचाइजीच्या ‘गोलमाल अगेन’मध्ये संधी मिळाली आहे; मात्र तिने आनंदाच्या भरात सिनेमाविषयी असे काही खुलासे केले आहेत की, ज्यामुळे ती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. अद्यापपर्यंत सिनेमातील एकाही पात्राविषयीची माहिती पुढे आलेली नाही, अशात परिणितीने केलेला खुलासा कितपत योग्य आहे, असा निर्मात्यांकडून प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. परिणितीने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, मी गेल्या काही दिवसांपासून चांगली कथा आणि कॉमेडी सिनेमाच्या शोधात होती. ‘गोलमाल अगेन’ या सिनेमामुळे माझा हा शोध आता संपला आहे. ‘गोलमाल अगेन’ मोठे बॅनर, फन आणि कॉमेडी फिल्म असून, त्यात या तिन्ही गोष्टींचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. हा सिनेमा साइन करण्याचे सर्वात मोठे कारण दिग्दर्शक रोहित शेट्टी हे आहेत. कारण माझी त्यांच्याबरोबर काम करण्याची सुरुवातीपासूनच इच्छा होती. मी त्यांचे सर्व सिनेमे बघितले आहेत. या सिनेमात काम करताना मला भरपूर काही शिकायला मिळत असून, प्रेक्षकांना नेमकं काय बघायचे असते, याविषयीच्या एकप्रकारच्या टीप्सच मला मिळत आहेत. पुढे बोलताना परिणिती म्हणाली की, मी टीमसोबत काम करताना एन्जॉय करत आहे. यावेळी तिने तिच्या भूमिकेविषयी खुलासा करताना म्हटले की, इतर कलाकारांच्या तुलनेत माझी भूमिका ‘कूल, मस्ती आणि कॉमेडी’ने भरपूर आहे. जेव्हा मी या भूमिकेसाठी अ‍ॅप्रोच झाली तेव्हांपासूनच खूप एक्सायटेड होती, असेही परिणिती सांगितले. कॉमेडीपट असलेल्या या सिनेमात कुठल्याही कलाकाराच्या भूमिकेविषयीचे स्पष्टीकरण दिले गेले नाही, अशात परिणितीने तिच्या भूमिकेविषयी खुलासा केल्याने ती चर्चेत आली आहे. या सिनेमाची शूटिंग गेल्या १० मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. सिनेमात परिणिती व्यतिरिक्त अजय देवगण, तब्बू, अरशद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, श्रेयस तलपडे, नील नितीन मुकेश यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची शूटिंग मुंबई, हैदराबाद, उटी आणि गोवा येथे केली जाणार आहे.