प्रियंकाचा ‘टाईम 100 गाला’मध्ये सुपरहॉट लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 21:53 IST
देसी गर्ल आता खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल झाली आहे. प्रियंका चोपडा हळूहळू हॉलिवूडवर आपली पकड मजबुत करताना दिसत आहे. ‘क्वांटिको’ ...
प्रियंकाचा ‘टाईम 100 गाला’मध्ये सुपरहॉट लूक
देसी गर्ल आता खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल झाली आहे. प्रियंका चोपडा हळूहळू हॉलिवूडवर आपली पकड मजबुत करताना दिसत आहे. ‘क्वांटिको’ मालिकेत काम केल्यापासून ‘पिगी चॉप्स’चे अमेरिकत चाहत्यांची यादी वाढली आहे.टाईम मॅगझिनने जगातील सर्वाधिक प्रभावशील लोकांच्या यादीत तिला मिळालेले स्थान तिच्या लोकप्रियतेची अधिकृत पावती आहे. टाईम मॅगझीनच्या कव्हरवर झळकणारी ती केवळ पाचवी बॉलिवूड सेलिब्रेटी आहे. न्यूयॉर्क येथे टाईम मॅगझीन आयोजित पार्टीमध्ये प्रियंका सहभागी झाली. यावेळभ तिने संपूर्ण पांढऱ्या रंगाचा पँटसुट परिधान केला होता. तिचे सौंदर्य या ड्रेसमध्ये आणखीनच उठून दिसत होते.रेड कार्पेटवरून चालताना प्रियंका हा प्रत्येक क्षण मनापासून एन्जॉय करतेय, असे स्पष्ट दिसत होते. चाहत्यांना फ्लायिंग किसेस , मीडियाला अतिशय मनमोकळ्यापणे ती भेटत होती. एवढेच काय तर तिने भारतीय पारंपरिक पद्धतीने नकस्कार करतानाची पोझ देखील दिली. प्रियंकाचे यश पाहता, सर्वांनाच तिचा अभिमान वाटतो.