Join us

प्रियांकाचा फोटो वादात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:44 IST

प्रियांका चोप्रा अमेरिकन टीव्ही शो क्वाटिंकोमध्ये कास्ट झाल्यापासून चांगलीच चर्चेत आहे. तिची जिकडे तिकडे प्रसंशा केली जात आहे. अनेक ...

प्रियांका चोप्रा अमेरिकन टीव्ही शो क्वाटिंकोमध्ये कास्ट झाल्यापासून चांगलीच चर्चेत आहे. तिची जिकडे तिकडे प्रसंशा केली जात आहे. अनेक पुरस्कारांनी तिचा सन्मान केला जातोय. यातच तिच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रकार ट्विटरवर सुरू झाला आहे. नेस्ट कोस्टा ट्रॅव्हलर मॅगझिनच्या कव्हरपेजवर प्रियांकाचा फोटो प्र्रसिद्ध करण्यात आला आहे. या कव्हरपेजवर ती ज्या टॉपमध्ये दिसतेय त्या टॉपवर लिहिलेल्या शब्दांमुळे तिला चाहत्यांच्या नाराजीचा सामाना करावा लागतो आहे. }}}} ">http://तिच्या टॉपवर शरणार्थी (Refugee), अप्रवासी (Immigrant) आणि बाहेरील व्यक्ती(Outsider) हे शब्द लिहण्यात आले असून त्यांना लाल रंगाने रेषा ओढून ते कापण्यात आले आहे. मात्र प्रवासी (Traveller) हा शब्द कट केला नाही. यामुळेच प्रियांकावर टीका केली जात आहे. कट केलेल्या शब्दांमुळे प्रियांकाचे चाहते नाराज झाले असून ते आपआपल्या पद्धतीने व्याख्या करीत आहेत. प्रियांकाने शरणार्थी, अप्रवासी व बाहेरील व्यक्ती यांचा अपमान केला आहे असाही आरोप क रण्यात येत आहे.