प्रियांकाचे नवे घर १०० कोटीचे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 13:22 IST
देसी गर्ल प्रियांका यशाची एकामागून एक शिखरे पार करत आहे. बॉलीवूडनंतर हॉलीवूडमध्येही आपले स्वतंत्र स्थान निर्माण तिने केले. तिचे ...
प्रियांकाचे नवे घर १०० कोटीचे?
देसी गर्ल प्रियांका यशाची एकामागून एक शिखरे पार करत आहे. बॉलीवूडनंतर हॉलीवूडमध्येही आपले स्वतंत्र स्थान निर्माण तिने केले. तिचे पुढेच ध्येय म्हणजे तिच्या स्टार स्टेटसला शोभून दिसेल असे घर बनवने आहे.अशी चर्चा आहे की, प्रियांका मुंबईत एक घर बनवत असून त्याची किंमत थोडीथोडकी नसून तब्बल शंभर कोटी असणार आहे. भारतात आतापर्यंत कोणत्याच अभिनेत्रीचे एवढे महागडे घर नाही. यावरून तिचे महत्त्व आधोरेखित होते.मुंबईतील व्हर्सोवा भागात तिचे हे स्वप्नातील घर तयार होणार असून एका टॉप बिल्डरला तिने हे काम सोपवले आहे. सर्व अत्याधुनिक सुखसुविधांनी सज्ज असलेले हे घर एखाद्या राजमहालापेक्षा कमी नसावे अशी तिने सूचना केली आहे. स्वप्नमहाल : प्रियांका चोप्राचे व्हर्सोवा येथील हे घर रिनोव्हेट केले जाणार आहे Photo Credit : UrbanAsianसध्या या घराचे बांधकाम सुरू असून प्रियांका कामात व्यस्त असूनही स्वत: प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीकडे लक्ष देत आहे. ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या सीझनमध्ये प्रियांका सीआयए एजंटच्या भूमिकेत असून न्यूयॉर्क येथे त्याची शूटींग सुरू आहे.कामानिमित्त वर्षांचे अनेक महिने ती अमेरिकेत राहते. परंतु मुंबईत स्वत:चे आलिशान घर असावे अशी तिची इच्छा आहे. शाहरुख खानचे घर ‘मन्नत’ बॉलीवूड सेलिब्रेटींमधील सर्वांत महागडे घरे आहे. त्याला टक्कर देण्याची तयारी प्रियांकाने सुरू केलेली दिसते.