Join us  

हातात हात गुंफलेला!! भारतातल्या मुक्कामात निक जोनासने क्षणभर सोडला नाही प्रियांकाचा हात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 10:23 AM

भारतातील मुक्काम संपला आणि प्रियांका व निक जोनास अमेरिकेला रवाना झालेत. गुरुवारी रात्री उशीरा मुंबई विमानतळावर दोघेही दिसले. त्यांचे विमानतळावरचे हे फोटो बरेच काही सांगणारे आहेत.

ठळक मुद्देगेले काही दिवस प्रियांका व निक दोघेही भारतात होते. या भारतातील आपल्या मुक्कामात या जोडप्याने एकमेकांचा हात सोडला नाही.

भारतातील मुक्काम संपला आणि प्रियांका व निक जोनास अमेरिकेला रवाना झालेत. गुरुवारी रात्री उशीरा मुंबई विमानतळावर दोघेही दिसले. त्यांचे विमानतळावरचे हे फोटो बरेच काही सांगणारे आहेत. खरे तर प्रियांका चोप्रा आणि निक जोनास एकमेकांत गुंतलेत, यावर आता शंका घेण्याची गरज नाही. कारण सार्वजनिक जीवनात त्यांचा वावर हेच सांगणारा आहे. गेले काही दिवस प्रियांका व निक दोघेही भारतात होते. या भारतातील आपल्या मुक्कामात या जोडप्याने एकमेकांचा हात सोडला नाही.

 सर्वात आधी प्रियांका चोप्रा आपल्या फॅमिलीसोबत निकला डिनर डेटवर घेऊन गेली. यावेळी प्रियांकाची आई मधु चोप्रा ही सुद्धा त्यांच्यासोबत होती. यावेळी प्रियांका व निक अगदी मीडियासमोर हात हात घालून दिसले. 

त्यानंतर निक व प्रियांका गोव्यात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेत. अर्थात गोव्यातील त्यांची ट्रिप त्यांनी बऱ्यापैकी सीक्रेट ठेवली. अनेक प्रयत्न करूनही मीडियाला त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही. 

यानंतर काल मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्या प्री-एंगेजमेंट सेरेमनीतही प्रियांका व निक यांनी एकमेकांच्या हातात हात घालूनचं एन्ट्री घेतली. त्यांनी एकमेकांना हात कदाचित क्षणभरही सोडला नाही.

आज शुक्रवारी प्रियांका व निक अमेरिकेला रवाना झालेत, तत्पूर्वी मुंबई विमानतळावर या कपलला पाहिले गेले. येथेही दोघांचे हात एकमेकांत गुंतलेलेचं दिसले. 

दोघेही काळ्या रंगाच्या ट्रकसूटमध्ये होते. यावेळी निक पूर्णवेळ प्रियांकाला प्रोटेक्ट करताना दिसला.

गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूड अभिनेता निकशी प्रियांकाचे नाव जोडले जात आहे. प्रियांकाकडून अद्यापपर्यंत तिच्या या रिलेशनबद्दल कुठल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य समोर आले नाही. गेल्या आठवड्यात प्रियांकाला निकच्या कजिनच्या लग्नातही बघण्यात आले होते. याठिकाणीदेखील दोघांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची केमिस्ट्री बघावयास मिळाली.  अलीकडे प्रियांका निकसोबत सुप्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर दिसली होती. त्यांचा येथील एक व्हिडिओ एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर लीक केला होता. यानंतर प्रियांका व निक एका बोट पार्टीत दिसले होते. या पार्टीत अनेकजण होते. पण प्रियांका व निक यांनी एकमेकांची सोबत सोडली नाही. 

२०१७ मध्ये ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियांका व निक सोबत दिसले होते. निकची ‘डेट’ बनून प्रियांका या रेड कार्पेटवर उतरली होती. प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती.

 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टरिलेशनशिपहॉलिवूड