प्रियांकासोबत सनी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 18:03 IST
सध्या सनी लिओनीचा सोशल मीडियावरील एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. हा फोटो आहे न्यूयॉर्कमधला.
प्रियांकासोबत सनी!
हॉट अॅण्ड बोल्ड सनी लिओनीला कोण ओळखत नाही? अनेक बॉलिवूडपटांमधील सनीच्या हॉट अदांनी प्रेक्षकांना वेडे केले आहे. लवकरच सनी शाहरूख खानच्या ‘रईस’ या चित्रपटात एका आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. शिवाय यानंतर सनीचा ‘तेरा इंतजार’ हा सिनेमा येऊ घातला आहे. या चित्रपटात सनी अरबाज खानसोबत दिसणार आहे. पण सध्या सनीचा सोशल मीडियावरील एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. हा फोटो आहे न्यूयॉर्कमधला. यात सनी आणि प्रियांका चोप्रासोबत दिसते आहे. हॉलिवूडमध्ये बिझी असलेल्या प्रियांकासोबतचा हा फोटो सनीने टिष्ट्वटरवर शेअर केला आहे. सोबत कॅप्शन दिलेय, ‘Such a nice afternoon with@priyankachopra good times in NYC!! LOVE ;) you are such a doll!’