Join us

प्रियंका म्हणते, आजीबद्दल चर्चचा व्यवहार दु:खद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 18:10 IST

आपल्या आजीच्या अंतिम संस्कारावेळी केरळमधील कुमारकोम येथील स्मशानभूमीत जागा न दिल्याबद्दल अभिनेत्री प्रियंका चोप्राने नाराजी व्यक्त केली. चर्चने केलेला ...

आपल्या आजीच्या अंतिम संस्कारावेळी केरळमधील कुमारकोम येथील स्मशानभूमीत जागा न दिल्याबद्दल अभिनेत्री प्रियंका चोप्राने नाराजी व्यक्त केली. चर्चने केलेला दुर्व्यवहार अत्यंत दु:खद असल्याचेही प्रियंका म्हणाली.प्रियंकाची आजी मेरी जॉन अखोरी यांच्यावर कुमारकोम येथून ४५ कि. मी. असणाºया चर्चजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. मेरी जॉन यांची कुमारकोम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात यावेत अशी इच्छा होती. ‘चर्चची कृती अत्यंत चुकीची होती. आम्ही त्याकडे लक्ष दिले नाही. आमच्या कुटुंबातील व्यक्ती गेल्याचे दु:ख आम्हाला होते, असे प्रियंका म्हणाली.अखोरी यांनी हिंदू कुटुंबात लग्न केल्याबद्दल आणि नियमानुसार कृत्य न केल्याबद्दल चर्चने अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली होती. अखोरी यांचे चुलत बंधू एलियास कावलप्परा यांनी सांगितले की, त्यांनी याबद्दल माफी मागितली होती. दोन वर्षापूर्वीच चर्चशी व्यवहार केला होता. चर्चने असे का केले, याबद्दल कोणतेही कारण नाही. हे २१ वे शतक आहे. आपण जुन्या काळात राहत नाही.’