Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ प्रियंका म्हणाली, ‘१ कोटी ३० लाख....मुबारक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 04:48 IST

  Twitterवर अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्या फॉलोअर्सची संख्या १ कोटी ३० लाखांवर पोहोचली आहे. प्रियंका यामुळे जाम आनंदात आहे. ...

 
 
    Twitterवर अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्या फॉलोअर्सची संख्या १ कोटी ३० लाखांवर पोहोचली आहे. प्रियंका यामुळे जाम आनंदात आहे. फ्लोरिडाच्या बोका रॅटन समुद्र किनारी याचा आनंद तिने साजरा केला. याचठिकाणी प्रियंकाचा पहिला हॉलिवूडपट ‘बेवॉच’चे चित्रीकरण सुरु आहे. ३३ वर्षीय प्रियंकाने आपल्या तमाम चाहत्यांचे आभार मानले. Twitterवर फॉलोअर्सचा महापूर येवो, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. ‘१ कोटी ३० लाख....मुबारक! उम्मीद है यह सिलसिला जारी रहेगा’, असे पोस्ट तिने केलेयं. गतवर्षी एबीसीच्या ‘क्वांटिको’ नामक शोमधील दमदार अभिनयाने प्रियंकाने जगभरातील लोकांची मने जिंकली होती. आता प्रेक्षकांना तिच्या ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटाची प्रतीक्षा आहे. यात प्रियंका मुख्य विलेनची भूमिका साकारत आहे.