Join us

‘ही’ अभिनेत्री साकारणार प्रियंका गांधी यांची भूमिका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 18:37 IST

हंसल मेहता यांचा ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाची शूटिंग येत्या ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते ...

हंसल मेहता यांचा ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाची शूटिंग येत्या ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत, तर अक्षय खन्ना संजय बारूंच्या भूमिकेत बघावयास मिळेल. दरम्यान, या चित्रपटातील एका नव्या पात्राबद्दलची माहिती समोर आली असून, ते पात्र प्रियंका गांधी यांचे आाहे. होय, प्रियंका गांधी यांची भूमिका आहना कुमारी साकारताना बघावयास मिळणार आहे. आहना ‘लिपस्टिक अंडर माय बुरका’ या चित्रपटात यापूर्वी बघावयास मिळाली आहे. चित्रपटात आहना प्रियंका गांधी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटासाठी आहनाचा लूक पूर्णपणे ट्रान्सफार्मेशन केला आहे. चित्रपटाची कथा हंसल मेहता यांनी लिहिली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीवरून बराचसा वाद निर्माण झाला होता.  दरम्यान, चित्रपटाला सुनील बोहरा प्रोड्युस करीत आहेत. याअगोदर त्यांनी ‘गॅँग्स आॅफ वासेपूर’ आणि ‘साहेब बीवी और गॅँगस्टर’ यांसारखे चित्रपट प्रोड्युस केले आहेत. संजय बारू २००४  ते २००८ दरम्यान तत्कालीन पंतप्रधानांचे मीडिया सल्लागार होते. त्यांनी माजी पंतप्रधानांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा खुलासा केला. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनाअगोदरच चर्चेत राहण्याची शक्यता आहे. विजय रत्नाकर गुट्टा चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.