Join us

​प्रियांकाने हॉलिवूड चित्रपट सोडण्याचा घेतला निर्णय !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 14:42 IST

आपणास माहित आहे की, प्रियांकाने क्वांटिकोच्या दुसऱ्या सीजनची शूटिंग सुरू केली आहे. विशेष म्हणजे प्रियांकाने क्वांटिकोला मिळालेल्या यशामुळे हॉलिवूडचे ...

आपणास माहित आहे की, प्रियांकाने क्वांटिकोच्या दुसऱ्या सीजनची शूटिंग सुरू केली आहे. विशेष म्हणजे प्रियांकाने क्वांटिकोला मिळालेल्या यशामुळे हॉलिवूडचे चित्रपट सोडण्यासाठी तयार आहे. तिने हा निर्णय नुकताच घेतला आहे. आणि फक्त हॉलिवूडच नव्हे तर तिने क्वांटिकोच्या मोहामुळे बॉलिवूडचे प्रोजेक्ट्सनादेखील नकार दिला आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, ती भारत भेटीत संजय लीला भंसाली, करन जौहर, जोया अख्तर, फरहान अख्तर यांना भेटली, मात्र तिने कोणताच चित्रपट साइन नाही केला, ज्याचे मुख्य कारण आहे क्वांटिको सीजन २ ज्यात ती २०१७ पर्यंतच्या करारात अडकली आहे. या कराराची प्रियांकाला कोणतीही अडचण नाही. तिच्या मते जर सीजन ३ देखील मिळाला तर ती आनंदाने स्विकारेल कारण या शोमधून तिला वर्ल्डवाइड आॅडियन्सशी जुळण्याची संधी मिळते, जी चित्रपट करून देखील नाही मिळणार.