Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘क्वांटिको’च्या सेटवर पाहा देसी गर्ल प्रियंका चोपडाचा जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 21:30 IST

प्रियंका चोपडाने ‘क्वांटिको’च्या सेटवरील काही फोटोज् शेअर केले असून, त्यामध्ये तिचा अंदाज बघण्यासारखा आहे.

देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या तिच्या ‘क्वांटिको’ या टीव्ही मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगदरम्यानचे काही फोटोज् ती नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करीत असते. आतादेखील तिने काही फोटोज् शेअर केले असून, त्यामध्ये ती तिची सहकलाकार मार्ली मॅटलिनसोबत बघावयास मिळत आहे. मार्लीसोबतच्या या खास क्षणांचे फोटोज प्रियंकाच्या चाहत्यांकडून चांगले पसंत केले जात आहेत. काही वेळातच प्रियंकाच्या या फोटोंना हजारोंच्या संख्येने लाइक्स आणि कॉमेण्ट्स मिळत आहेत.  दरम्यान, ‘हे फोटो शेअर करताना प्रियंकाने लिहिले की, मार्ली मॅटलिन अत्यंत उत्तम अभिनेत्री आहे. मात्र त्याचबरोबर ती चांगली उशीही होऊ शकते.’ एका फोटोत प्रियंका मॅटलिनच्या मांडीवर डोके ठेवून झोपली आहे. त्याचबरोबर तिने इतरही काही फोटोज शेअर केले असून, त्यामध्ये प्रियंकाचा जलवा बघण्यासारखा आहे. एका फोटोमध्ये ती संपूर्ण क्वांटिको टीमसोबत बघावयास मिळत आहे.  सध्या प्रियंका ‘क्वांटिको’च्या तिसºया सीजनचे शूटिंग करीत आहे. या मालिकेत प्रियंका एलेक्स पेरिसच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे नवे कॅलेंडर प्रदर्शित करण्यात आले. ज्यामधील प्रियंकाच्या फोटोमुळे चांगलाच वाद निर्माण झाला. प्रियंकाच्या फोटोला कॉँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने विरोध दर्शविला होता. या नेत्याने प्रियंकाच्या ड्रेसवर टीका केली होती. प्रियंका आसाम राज्य टूरिझमची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे.