Join us

See Romantic Pics: समुद्राच्या मधोमध पतीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ‘ही’ अभिनेत्री; तिला राहिले नाही जगाचेही भान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 17:37 IST

अभिनेत्री देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता ग्लोबल आयकॉन बनली आहे. सध्या ती पती निक जोनाससोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसतेय. ती तिचे पोस्ट बर्थडे सेलिब्रेशन एन्जॉय करत आहे.

बॉलिवूड तसेच हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता ग्लोबल आयकॉन बनली आहे. सध्या ती पती निक जोनाससोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसतेय. ती तिचे पोस्ट बर्थडे सेलिब्रेशन एन्जॉय करत आहे. १८ जुलैला तिने लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. यासाठी तिने मियामी हे ठिकाण निवडले आहे. तिचे काही रोमँटिक फोटो व्हायरल झाले असून पतीसोबत समुद्राच्या मधोमध प्रेमात आकंठ बुडालेली दिसते. यावेळी तिला जगाचे कुठलेही भान उरले नसल्याचे फोटोंवरून समजतेय.

मियामी येथे एन्जॉय करत असलेल्या तिच्या पोस्ट सेलिब्रेशनमध्ये तिचे कुटुंबीय देखील दिसत आहे. तिने सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले असून समुद्राच्या मधोमध ती पती निकसोबत रोमान्स करताना दिसत आहे. गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये ती अत्यंत हॉट दिसते आहे. निक देखील तिला स्वत:च्या कुशीत घेऊन तिला न्याहाळताना दिसत आहे. 

त्याशिवाय अजून एक फोटो सोशल मीडियावर तिने शेअर केली आहे. ज्यात ती खुपच प्रेमाने तिचे पती निक याच्याकडे पाहत आहे. चाहत्यांना देखील त्यांचा हा रोमँटिक अंदाज प्रचंड भावला असल्याचे वाटतेय. त्यांचे हे फोटो वेगाने व्हायरल होत असून त्यांना मोठया प्रमाणावर लाईक केले जात आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा