असे म्हटले जात आहे की, क्वांटिको गर्ल प्रियंकाने रागाच्या भरातच डोक्यावर ग्लास फोडला आहे. सध्या प्रियंका तिच्या न्यूयॉर्कस्थित घरी सुट्या एन्जॉय करीत आहे. प्रियंकाच्या या व्हिडीओमध्ये ती एका काचेच्या ग्लासात वाइन पिताना दिसत आहे. मात्र अचानकच तिला असा काही राग येतो की, चक्क ती तो ग्लास स्वत:च्याच डोक्यावर फोडते. प्रियंका डोक्यावर ग्लास फोडताच बॅकग्राउंडमध्ये एक इंग्रजी म्युझिक ऐकायला मिळते.
प्रियंकाने हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये आपल्या मनातील भावना लिहिल्या. ‘असे तेव्हा घडते जेव्हा नाइन ते वाइनपर्यंत काम केले जाते. यास घरी करण्याचा अजिबातच प्रयत्न केला जाऊ नये.’ प्रियंका चोपडा सध्या तिच्या आगामी ‘क्वांटिको’च्या सीजन ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर ती काही हॉलिवूडपटांवरही काम करीत आहे.