Join us  

प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेन्ड निक जोनास कुटुंबासह मुंबईत! होणार ग्रॅण्ड घोषणा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 8:53 AM

प्रियांका चोप्राने येत्या १८ आॅगस्टला मुंबईत आयोजित केलेल्या एका ग्रॅण्ड पार्टीत प्रियांकाचा बॉयफ्रेन्ड निक जोनास आणि त्याचे अख्खे कुटुंब सहभागी होणार, ही बातमी आम्ही याआधीचं तुम्हाला दिली होती. 

प्रियांका चोप्राने येत्या १८ आॅगस्टला मुंबईत आयोजित केलेल्या एका ग्रॅण्ड पार्टीत प्रियांकाचा बॉयफ्रेन्ड निक जोनास आणि त्याचे अख्खे कुटुंब सहभागी होणार, ही बातमी आम्ही याआधीचं तुम्हाला दिली होती. त्यानुसार, निक जोनास व त्याचे मॉम-डॅड भारतात पोहोचले आहेत. आज मुंबई विमानतळावर निक आपल्या मॉम-डॅडसोबत दिसला. प्रियांकाने आयोजित केलेल्या या पार्टीत प्रियांका व निकच्या लग्नाच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष या पार्टीतील घोषणेकडे लागले आहे. ही पार्टी मुंबईत होणार आहे. पण मुंबईत कुठे, म्हणजे पार्टी वेन्यू काय असेल, हे अद्यापही कळलेले नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून निक आणि प्रियांका यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा आहेत. पण अद्याप प्रियांका व निक या दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे हे मान्य केलेले नाही. दोघांचा साखरपुडा झाल्याचेही मानले जात आहे. पण प्रियांका वा निक याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत.

खरे तर प्रियांका व निक येत्या १६ सप्टेंबरला लग्न करणार असे मानले जात आहे. कारण या दिवशी निकचा वाढदिवस असतो. अर्थात ही सुद्धा गॉसिप्सच्या दुनियेतून आलेली एक बातमी आहे. खरे काय, ते प्रियांकाने सांगितल्यानंतर आपल्याला कळणार आहे आणि त्यामुळे तिच्या ग्रॅण्ड पार्टीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूड अभिनेता निकशी प्रियांकाचे नाव जोडले जात आहे. प्रियांकाकडून अद्यापपर्यंत तिच्या या रिलेशनबद्दल कुठल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य समोर आले नाही.  प्रियांकाला निकच्या कजिनच्या लग्नातही बघण्यात आले होते. याठिकाणीदेखील दोघांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची केमिस्ट्री बघावयास मिळाली होती.  अलीकडे प्रियांका निकसोबत सुप्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर दिसली होती. त्यांचा येथील एक व्हिडिओ एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर लीक केला होता. यानंतर प्रियांका व निक एका बोट पार्टीत दिसले होते. या पार्टीत अनेकजण होते. पण प्रियांका व निक यांनी एकमेकांची सोबत सोडली नाही. काही दिवसांपूर्वी प्रियांकाच्या आई व कुटुंबाला भेटण्यासाठी निक भारतात आला होता. भारतातील मुक्काम संपवून निक व प्रियांका अमेरिकेत रवाना झाले आणि येथून पुढे ब्राझिलला पोहोचले. ब्राझिलमध्ये निकचे लाईव्ह कॉन्सर्ट होते. येथे प्रियांकाही त्याच्यासोबत होती.२०१७ मध्ये ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियांका व निक सोबत दिसले होते. निकची ‘डेट’ बनून प्रियांका या रेड कार्पेटवर उतरली होती. प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा