Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्राचा सेटवर अ‍ॅक्सिडेंट; हॉस्पिटलमध्ये करावे लागले अ‍ॅडमिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 12:01 IST

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राच्या चाहत्यांना शॉक बसेल अशी बातमी आमच्याकडे आहे. प्रियांकाला काल तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. नुकतीच ...

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राच्या चाहत्यांना शॉक बसेल अशी बातमी आमच्याकडे आहे. प्रियांकाला काल तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. नुकतीच भारतात येऊन परत अमेरिकेला गेलेल्या प्रियांकाचा ‘क्वांटिको-सीझन २’च्या सेटवर अपघात झाला असून तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांकाने काही दिवसांच्या ब्रेकनंतर ‘क्वांटिको’ या इंग्रजी मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची पुन्हा शुटींग सुरू केली आहे. काल एका अ‍ॅक्शन सीनचे चित्रिकरण करताना पाय घसरून तिच्या डोक्याला इजा झाली. त्यामुळे तिला ताबोडतोब दवाखान्यात नेण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टर तिच्यावर उपचार करीत असून चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात येतेय.तिच्या पब्लिसिस्टनेदेखील या वृत्ताला दुजोरा दिला असून विकेंड नंतर पुन्हा शूटींगला सुरूवात करणार असल्याचे सांगितले. सर्व चाहत्यांनी ती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थनापर संदेश सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मागच्या रविवारी ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्करांमध्ये आपली छाप पाडलेल्या प्रियांकाला अशा प्रकारे दुखापतीला सामोरे जावे लागल्याने तिच्या चाहत्यांना फार वाईट वाटत आहे.आपल्या फॅनशी सदैव सोशल मीडियाद्वारे कनेक्टेड राहणाऱ्या प्रियांकाने जर हॉस्पिटलमधून एखादी सेल्फी शेअर केली तर आश्चर्य वाटू देऊ नका. तिच्या आयुष्यातील छोटी-मोठ्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये ती आघाडीवर आहे. ‘क्वांटिको’ बरोबरच प्रियांका तिचा हॉलीवूड डेब्यू चित्रपट ‘बेवॉच’साठीसुद्धा चर्चेत आहे. ड्वेन जॉन्सन (द रॉक) आणि झॅक अ‍ॅफ्रोनसोबत ती झळणार असून ती सिनेमात खलनायिकेच्या भूमिकेत आहे.